पंतप्रधान मोदी यांनी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आज भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांना दृकश्राव्य पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच विरोधकांच्या झालेल्या बैठकीचा संदर्भावरून विरोधांवर टीका करताना शरद पवार यांच्यावर तसंच महाराष्ट्रातील विविध घोटाळ्यांचा संदर्भ देत विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थ व्यवस्थेची माहिती पोहोचवा
मोदी सरकारच्या ‘गरीब कल्याण’ कार्यक्रमातून गरीबांचे उंचावलेले जीवनमान, सर्वसमावेशक विकासामुळे जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी भारताची अर्थव्यवस्था याची माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सामान्य माणसांपर्यंत घरोघरी जाऊन पोहचविली पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. भोपाळ येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १० लाख बूथ वरील कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका, शरद पवार यांच्या मुलीचे भले करायचे असेल तर राष्ट्रवादीला मत द्या पंतप्रधान मोदी यांच्याकडून पहिल्यादाच शरद पवारांचे नाव घेत साधला निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी पाच वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना अंगणवाडी शाळांमध्ये खजूर आणि इतर फळं वाटण्याचाही सल्ला दिला. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं …
Read More »जयंत पाटील यांचा सवाल, मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे ?;अशा हुकूमशाहीला…
मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे ? असा संतप्त सवाल करतानाच महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही. अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिला. जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्र्यांच्या …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा प्रत्युत्तर, शरद पवार म्हणाले ते खरं आहे, पण… शरद पवारांच्या वक्तव्यावरून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलेला असताना आता देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातही तसेच दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. आधी देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना मुत्सद्देगिरीवरून टोला लगावल्यानंतर त्यावर शरद पवारांनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला होता. आता माध्यमांशी बोलताना पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना खोचक शब्दांत …
Read More »फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर शरद पवार यांचा पलटवार, हे ही त्यांच अज्ञानच… मी सर्वांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं होतं, तेव्हा फडणवीस शाळेत असतील
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमेकांवर टोलेबाजी चालू असताना दुसरीकडे फडणवीसांनी शरद पवारांविषयी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. चंद्रपूरमध्ये मोदी सरकारच्या ९ वर्षपूर्तीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्र सोडलं. यावेळी …
Read More »नाना पटोले यांचा टोला, भाजपाला इतिहासच नाही त्यावर ते काय बोलणार?
देशातील आणिबाणीवरून नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले. त्याचबरोबर भाजपाकडूनही आणिबाणीच्या मुद्यावरून काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली. भाजपाच्या टीकेला प्रत्त्युतर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला इतिहासच नाही त्यावर ते काय बोलणार? असा टोला लगावत भाजपाने आधी नीट अभ्यास करायला पाहिजे असा खोचक सल्लाही दिला. टिळक भवन येथे …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, बीआरएस भाजपाची ‘बी’ टीम, तेलंगणा पॅटर्नचा लवकरच…
तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपाची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले असून त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे. तेलंगणात केसीआर यांच्या …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची टीका, भाजपाचा डिएनच ओबीसी, तर राष्ट्रवादीला केवळ….
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू आहे. पक्ष संघटनेत जबाबदारी मिळावी, अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली. यानंतर प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्यांना मिळावं, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्र सोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षात केवळ चेहरे दाखवण्यासाठी ओबीसी हवे …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांनी उडविली खिल्ली, दहा मुख्यमंत्री असलेली पार्टी… मुख्यमंत्री पदासाठी विठुरायाकडे जातायत..
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या प्रमुख नेत्यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचे लोण काँग्रेसमध्येही पसरले. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचेही त्यांच्या समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर लागण्यास सुरुवात झाली. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने उध्दव ठाकरे यांना पुन्हा …
Read More »
Marathi e-Batmya