Tag Archives: निर्यात

राजनाथ सिंग म्हणाले, ६०० कोटी ते २१००० कोटी रूपयांपर्यंत निर्यात वाढली संरक्षण विषयी शस्त्रांत्र्यांच्या निर्यातीत वाढ

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी २०२९-३० या आर्थिक वर्षात भारत संरक्षण निर्यातीत ५०,००० कोटी रुपयांहून अधिक साध्य करेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे, आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्याद्वारे संरक्षण उत्पादनात स्वावलंबन वाढवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर येथे ६५ व्या स्थापना दिनाच्या समारंभात …

Read More »

रविकांत तुपकर यांच्याबरोबरील बैठकीत अजित पवार यांनी दिले हे आश्वासन सोयाबीन, कापसासह शेतमालाला योग्य वाढीव हमीभाव देण्यासह केंद्र शासनाची अनुकुल भूमिका

शेतकऱ्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका असून सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी, तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकुलता दर्शविली आहे. ऊसाचा एमएसपी वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचे …

Read More »

अहमदनगरमधील महिला शेतकऱ्याची डाळिंबे निघाली ऑस्ट्रेलियाला कृषी पणन मंडळाच्या वाशी विकीरण सुविधा केंद्रातून पहिली खेप रवाना

महाराष्ट्रातील डाळिंबांची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांना चाखायला मिळणार आहे. राज्यातून डाळिंबांची पहिली खेप नुकतीच वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्या खेपेतून जाणारी डाळिंबे ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी श्रीमती कल्पा खक्कर यांच्या शेतातील आहेत. डाळिंब उत्पादनात भारत हा …

Read More »

भारताची निर्यात $८०० अब्जपर्यंत वाढविण्याचा मानस सध्या $२०० निर्यात होते, मात्र आता वाढविण्याची आशा

आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण निर्यात $२०० अब्ज ओलांडून या आर्थिक वर्षात भारताला $८०० अब्ज डॉलरची निर्यात होण्याची आशा आहे. “तिमाही आकडेवारी खूप आशावादी आहेत. हीच प्रवृत्ती कायम राहिल्यास आम्ही या आर्थिक वर्षात ८०० अब्ज डॉलरची निर्यात पार करू,” असे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सोमवारी सांगितले. वाणिज्य मंत्रालयाने जारी …

Read More »

भारताची निर्यात ९.१ टक्क्याने वाढली ३८.१३ अब्ज डॉलर इतकी वाढली निर्यात

अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स आणि कापड यांसारख्या क्षेत्रांमुळे मे २०२४ मध्ये भारताच्या मालाची निर्यात ९.१ टक्क्यांनी (वर्षानुवर्षे) वाढून $३८.१३ अब्ज झाली आहे, त्यानुसार जागतिक मागणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. शुक्रवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार. मे २०२४ मध्ये पेट्रोलियम, वाहतूक उपकरणे, चांदी आणि वनस्पती तेलाच्या शिपमेंटमध्ये वाढ झाल्याने आयात …

Read More »

मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी दिलेले राज्याचे निर्यात प्रोत्साहन धोरण नेमके आहे काय ? राज्यातील निर्यातीला वेग देणार

राज्यातील निर्यात क्षेत्राला गती देऊन, थेट परकीय गुंतवणूक (FDI) आकर्षित करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे राज्यात अंदाजे रुपये २५,००० कोटी गुंतवणूक होईल. हे धोरण कालावधीमध्ये सन २०२७-२८ पर्यंत राबविण्यात येईल. सध्या …

Read More »

कच्चे तेल आणि डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स घटवला डिझेलवरील विंडफॉल टॅक्सही कमी

केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅकल कमी करून ९.०५० रुपये प्रति टन केले. यापूर्वी, २९ सप्टेंबर रोजी संपलेल्या १५ दिवसांच्या आढाव्यात, देशातील क्रूडवरील अनपेक्षित विंडफॉल कर १२,२०० रुपये प्रति टन करण्यात आला होता. डिझेलवरील विंडफॉल टॅक्सही कमी याशिवाय डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स ५ रुपये प्रति लिटरवरून ४ …

Read More »

खुषखबर, लॅपटॉप आणि टॅब्लेटच्या आयातीवर बंदी हटविली हार्डवेअर उद्योगाच्या दबावामुळे सरकारने निर्णय मागे घेतला

भारतीयांसाठी एक खुषखबर असून लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याच्या आधीच्या निर्णयापासून केंद्र सरकार मागे हटले आहे. भारत लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालणार नाही, असे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी म्हटले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये भारताने लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. भारतातील लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या …

Read More »

मारुती सुझुकीचा ऑगस्टमध्ये विक्रीचा विक्रम, इतकी विकली वाहने हुंदाई कंपनीही मारुतीच्या बरोबरीने

वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीच्या वाहनांच्या मासिक विक्रीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. मारुती सुझुकीने ऑगस्ट महिन्यात तब्बल १.८९ लाख वाहने विकली आहेत. मारुतीची एका महिन्यातील ही सर्वाधिक विक्री आहे. कंपनीने ऑक्टोबर २०२० मध्ये १,८२,४४८ वाहनांची विक्री केली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने १,६५,१७३ युनिट्स पाठवले होते. यासोबतच कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी …

Read More »