Tag Archives: शरद पवार

वयाच्या मुद्यावरून शरद पवार यांची अजित पवारांना चपराक, तर न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी दिली माहिती

एक वेळ असते, कुठे तरी थांबायचं असतं, सरकारी नोकर, उद्योजक यांनी आपल्या तरूणाईच्या हाती पुढील अधिकार सोपवित ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत आणि आर्शिवाद देतात. घरी आराम करावा, निवृत्ती घ्यावी पण साहेबांच वय ८२ झालं तरी अजूनही निवृत्ती घ्यायला तयार नाहीत. निवृत्त व्हायचं एक वय असतं. सरकारी कर्मचारी ५८ व्या वर्षी तर …

Read More »

शरद पवार म्हणाले, …पण त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीत या नेत्यांवर निलंबनाची कारवाईः या आठ ठरावांना मंजुरी

मागील काही महिन्यांपासून सातत्याने अजित पवार हे भाजपाला जाऊन मिळणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार अजित पवार हे भाजपाच्या सत्तेतही सहभागी झाले. मात्र अजित पवार यांनी जाताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही दावा दाखल केला. तसेच आमचीच राष्ट्रवादी खरी असल्याचे सांगत शरद पवार यांच्याविरोधातील खदखदीला वाट मोकळी करून दिली. त्यानंतर आज दिल्ली दौऱ्यावर …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा इशारा, …पण हा जखमी शेर..अजूनही वेळ गेलेली नाही लढाई केवळ पावसामुळे लढली जाते असे नाही, तर लढाई ही हुशारीने जिंकली जाते

देशात संविधान तुडवले जात असल्याचे चित्र दिसते. आमदार हा खरेदी-विक्री संघ आहे, की कांद्याचा भाव आहे अशी टीका पक्षाचे प्रतोद आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारासाठी तुम्हाला शरद पवारसाहेब लागतात. आता अचानक तुम्ही म्हणता की, आम्हाला शरद पवार नको. तुम्ही साहेबांचा चेहरा का वापरता. तुम्ही मतदारांना …

Read More »

शक्तीप्रदर्शनाच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार यांच्या पाठीशी कोणते आमदार? बहुतांष आमदारांचा अजित पवारांच्या बाजूनं कल

मागील काही महिन्यापासून अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याची अटकळ बांधण्यात येत होती. अखेर त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत २ जुलै रोजी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचा झेंडा फडकवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच अजित …

Read More »

अजित पवार यांनी जाहिर केले राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच, पवारांच्या बैठकीला कोणीच नव्हते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत केला दावा

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून तीन दिवस होत नाही तोच अजित पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडे दाखल केलेल्या याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मीच असून माजी निवड संपू्र्ण पक्षाच्या कार्यकारणीने आणि सदस्यांनी केली असल्याचा दावा अजित पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच शरद …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा अजित पवार गटाला इशारा, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी… माझ्या आई आणि बापाचा नाद करायचा नाय

दिवसेंदिवस राष्ट्रवादी काँग्रेसमधील काका-पुतण्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरून संघर्ष शिगेला पोहोचत चालला आहे. त्यातच आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या गटाच्यावतीने समर्थक आमदार-कर्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी… बाकी कुणावरही बोला पण माझ्या आई आणि …

Read More »

अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवार यांचे प्रत्युत्तर, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली नवीन कर्तृत्वान पिढी घडवू

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणाची पोलखोल करत वाढत्या वयानुसार कुठंतरी थांबायचं असतं असे सांगत निवृत्ती घेण्याचा सल्ला शरद पवार यांना दिला. तसेच शरद पवाराचं राजकारण कसं धरसोडीचं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं किती नुकसान झालं याचा गौप्यस्फोटही केला. अजित पवार यांच्या या भाषणाची शरद पवार …

Read More »

अजित पवार यांची शरद पवारांना म्हणाले; घरी आराम करायला हवं, हट्टीपणा सोडा मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही हा, माझा दोष आहे का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे कोविड काळातही आताही सातत्याने महाराष्ट्राबरोबर देशातील अनेक भागात जात सातत्याने दौरे करत असतात. मात्र काही जणांनी त्यांच्या वयाचा उल्लेख केल्यास स्वतः शरद पवार हे मला म्हातारा म्हणू नका, किंवा वय झालंय असे म्हणून मला निवृत्त व्हा असे सांगू नका असा प्रेमळ सूचना करायचे. परंतु …

Read More »

छगन भुजबळ यांनी ठेवले मर्मावर बोट, …अनेक नेत्यांना आपण तोंडघशी पाडतो … शरद पवार आमचे विठ्ठल, बडव्यांनी (?) घेरलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाला रामराम करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्यांच्या विरोधात अपात्रतेचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. तर अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेची कारवाई …

Read More »

नाना पटोले यांची टीका, मोदी-शहा यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडी महाविकास आघाडी भाजपाविरोधात सक्षमपणे व एकजुटीने लढा देईल :- एच. के. पाटील

महाराष्ट्रात एक असंवैधानिक सरकार सत्तेवर असून अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन कमळचा हा प्रकार जनतेला आवडलेला नाही. कर्नाटकच्या जनतेने भाजपाला घरी बसवले आहे. महाराष्ट्रात आधी उद्धव ठाकरे यांना व आता शरद पवार यांना काही आमदार सोडून …

Read More »