Tag Archives: cabinet meeting

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी ५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यातून जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत बांबू उत्पादनात महाराष्ट्राचे स्थान आणखी बळकट करण्यात येणार आहे. राष्ट्रीय बांबू मिशन आणि महाराष्ट्र मिशन २०२३ शी …

Read More »

अजित पवार यांची माहिती, पुणे-लोणावळा’ रेल्वेच्या दोन मार्गिका आणि मेट्रोची दोन स्थानके वाढणार प्रकल्पासाठी राज्यशासनाच्या आर्थिक सहभाग देण्यास मंत्रीमंडळाची मान्यता

पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्यमंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागला आहे. अजित पवार पुढे म्हणाले की,  मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या …

Read More »

मराठा आरक्षण प्रश्नी न्या शिंदे समिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा अंमलबजावणीचे आदेश काढण्याची जरांगे पाटील यांची मागणी, तर मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानंतर

मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस. काल राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चेची फेरी पार पडल्यानंतर आज चर्चेची दुसरी फेरी झाली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्यानंतर न्या शिंदे समितीने चर्चेसाठी आझाद मैदानावर पोहोचले. यावेळी झालेल्या चर्चेत काही मुद्यांवर मनोज जरांगे पाटील आणि …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत कोयना धरण पायथा विद्युतगृहासाठी ८६२ कोटी २९ लाख रूपयांची तरतूद, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयकाचे प्रारूप मंजूर, थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा) विधेयकाच्या प्रारूपास मंजुरी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मैला शुद्धीकरण केंद्रासाठी चिखली येथील जागा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर शेतकऱ्यांसाठी नव्या महाॲग्री-एआय धोरणास मंजूरी

राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.   बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (Generative Al), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoTs), ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता (Computer Vision), रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण (Predictive Analytics) यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत व विस्तारयोग्य …

Read More »

या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ तर या विद्यार्थ्यांना मिळणार विद्यावेतन शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी, पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ; बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार विद्यावेतन

राज्यातील शासकीय भौतिकोपचार (फिजीओथेरपी) व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल थेरपी) पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा आणि बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता प्रशिक्षण काळात दरमहा १ हजार …

Read More »

एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह, एक लाख रोजगार संधी आणणाऱ्या प्रकल्पांना मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

उद्योग विभागातील धोरण कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्रलंबित असलेल्या ३२५ प्रस्तावांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या प्रस्तावांना मंजुरी दिल्यामुळे १,००,६५५.९६ कोटी रूपयांची गुंतवणूक आणि ९३,३१७ रोजगार निर्मिती होणे अपेक्षित‍ आहे. उद्योग विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण २०१६ आणि त्याअंतर्गत फॅब प्रकल्पाकरिता प्रोत्साहने, महाराष्ट्राचे अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन  धोरण २०१८, रेडिमेड गारमेंट …

Read More »

केंद्र सरकारची एचसीएल-फॉक्सकॉनच्या सेमीकंडक्टर प्रकल्पाला मंजूरी ३ हजार ७०६ कोटी रूपयांचा डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स प्रकल्प उत्तर प्रदेशात उभारण्यास कॅबिनेट बैठकीत मंजूरी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी (१४ मे २०२५०) झालेल्या बैठकीत एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर संयुक्त उपक्रमाला मंजुरी दिली. तसेच उत्तर प्रदेशातील जेवर येथे अंदाजे ३,७०६ कोटी रुपयांचा डिस्प्ले चिप्स उत्पादन प्रकल्पासही मंजूरी देण्यात आली. प्रस्तावित एचसीएल-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑटोमोबाईल्स आणि इतर उपकरणांसाठी डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स तयार करेल, असे माहिती आणि …

Read More »

आयटीआयला जागतिक दर्जाच्या केंद्रात रूपांतरित करणाऱ्या धोरणाला शासनाची मंजुरी जागतिक मागणीनुसार रोजगारक्षम मनुष्यबळासाठी कौशल्य विभागाचे नवे पीपीपी धोरण

महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना (आयटीआय) जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये रूपांतरित करून उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता विभागाने तयार केलेल्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी अर्थात पीपीपी धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या धोरणामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण, संस्थेतील पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये थेट उमेदवारी प्रशिक्षण …

Read More »

अहिल्यानगरमधील चौंडी येथील एक दिवसाच्या मंत्री परिषदेच्या बैठकीसाठी २ कोटींचा खर्च सर्व मोठी पंचतारांकित हॉटेल्स आणि सरकारी विश्रामगृहे आधीच बुक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महायुती सरकारने मंगळवार, ६ मे रोजी अहिल्यानगर येथील चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी अहिल्यानगरमधील सर्व सरकारी विश्रामगृहे आणि खाजगी हॉटेल्स दोन दिवस आधीच बुक करण्यात आली आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह ३६ …

Read More »