धनगर समाजाच्या उन्नतीकरिता प्रभावीपणे योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्तीप्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन वित्त मंत्री यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात धनगर समाजाच्या उन्नतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे त्याचप्रमाणे शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार …
Read More »मंत्र्यांच्या मराठा आणि ओबीसी वादावर मुख्यमंत्री शिंदे यांनी केली “ही” सूचना
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे याप्रश्नी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण पुकारले होते. पण ऐन दिवाळीत आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील नागरिकांचे तोंड कडू व्हायला नको म्हणून यावर तोडगा काढत २ जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत राज्य सरकारला दिली. तसेच मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने शासन निर्णयही जारी केला. या आरक्षणाच्या …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन, प्रत्येक जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबवा
समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ प्रत्येक पालकमंत्र्यांनी प्राधान्याने राबवावा. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठक सभागृह येथे, मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रमाचा मुख्यमंत्री …
Read More »भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार पुतळ्याचे अनावरण
काश्मिरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील …
Read More »भाजपाचे प्रविण दरेकर यांचा आरोप, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा सट्टेबाजीत सहभाग महादेव अँपच्या माध्यमातून ५०८ कोटी मिळाले
भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी काँग्रेसचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर मोठा आरोप केला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा सट्टेबाजीतील सहभाग असून महादेव अँपच्या माध्यमातून त्यांना ५०८ कोटी मिळाले आहेत, हे पैसे निवडणुकीसाठी वापरण्यात येणार होते, असा गौप्यस्फोटही दरेकर यांनी केला आहे. त्यामुळे विकासाचा दावा करणारे काँग्रेस …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर बांबू लागवड प्रकल्पासह स्कुबा डायव्हिंग प्रकल्पाचा घेणार आढावा
राज्यात बांबू लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात येत असून सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली याचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासह कोयना धरणात राबविण्यात येणाऱ्या स्कुबा डायव्हिंगसारख्या जलपर्यटन प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील दरे तांब, अकल्पे येथे ऐन पावसाळ्यात …
Read More »विजय वडेट्टीवार यांची टीका, विद्यार्थी उपाशी असताना निर्ढावलेली यंत्रणा मात्र तुपाशी सरकारच्या गलथान कारभारामुळे ५० ओबीसी विद्यार्थी अडचणीत
परदेशी शिष्यवृत्तीचे पैसे न दिल्याने ५० ओबीसी विद्यार्थी संकटात आहेत. सरकारचा हा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे. सरकारच्या भरोशावर परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांनी जेवण, निवास खर्च भागवायचा कसा, हा प्रश्न आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभाग जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करतो. पण विद्यार्थ्यांना पैसे देत नाही. यासारखे दुर्दैव नाही. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, मराठा आरक्षण प्रगतीचा अहवाल आठवड्याला सादर करा
मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दुष्काळ जाहीर करतानाही सरकारचे राजकारण… ४० पैकी ३५ तालुके सत्ताधारी आमदारांचे
राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु हा दुष्काळ जाहीर करत असताना सरकार राजकारण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यापैकी जवळपास ३३ ते ३५ तालुक्यांचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असून त्यात काही मंत्र्यांचेही तालुके आहेत. विरोधी पक्षातील आमदारांच्या फक्त चार ते पाच तालुक्यांचा दुष्काळी …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ आहे का ? रेव्ह पार्ट्या आयोजित करणा-या एल्वीस यादवला ‘वर्षा’वरील गणपती आरतीचा मान
मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणे मुश्कील असते. वर्षा वर प्रवेश देताना विविध पातळ्यांवर सुरक्षेची तपासणी केली जाते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात वर्षावर गुंडांना सहज प्रवेश मिळत असल्याचे दिसते. सापांच्या विषाच्या रेव्ह पार्ट्या आयोजित करणा-या एल्वीस यादव सारख्या टुकार युट्युबरला विशेष आमंत्रण देऊन ‘वर्षा’वरील गणपती …
Read More »
Marathi e-Batmya