Tag Archives: kapil sibal

फुटलेल्या आमदारांच्या गटाला प्रतोद बदलण्याचा अधिकार कोणी दिला? कपिल सिबल यांचा सवाल शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केले

शिवसेनेतील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी नियमीतपणे सुनावणी सुरु आहे. आजच्या २२ फेब्रुवारी रोजी सुनावणीत शिवसेनेचे ठाकरे गट वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. पक्ष कोणाचा, व्हीप कोण बजावणार, प्रतोद कोण आणि अन्य मुद्द्यांवर कपिल सिब्बल यांनी भाष्य केलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन …

Read More »

कपिल सिबल यांचा आरोप, एकनाथ शिंदे बंड करणार हे राज्यपाल कोश्यारांनी माहित… कुठल्या अधिकारात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली

शिवसेना कुणाची? १६ आमदारांच्या अपात्रतेचं काय? या सगळ्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीचा दुसरा दिवस असून कपिल सिब्बल हे ठाकरे गटाच्या वतीने जोरदार युक्तिवाद सुरू आहे. आज त्यांनी जेवणानंतरच्या सत्रात एकनाथ शिंदे आणि त्यावेळी राज्यपाल असलेल्या भगतसिंह कोश्यारींवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे बंड करणार हे त्यावेळी …

Read More »

कपिल सिबल म्हणाले, विधिमंडळाचा गटनेता आणि प्रतोद पक्षाकडून नियुक्त होतो विधिमंडळातील सदस्य पक्षप्रमुख आणि प्रतोद नेमू शकत नाही

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी चालू असून ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पहिल्या दिवशी युक्तीवाद केला. आज दुसऱ्या दिवशीही त्याच प्रकारे कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. यामध्ये शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. यासाठी मुख्य प्रतोदपदी सदस्यांची निवड होण्याचा मुद्दा कळीचा ठरला आहे. …

Read More »

कपिल सिबल यांचा सवाल, अपात्रतेची टांगती तलवार असताना मुख्यमंत्री पदाची शपथ कशी? विधिमंडळातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालय निर्णय घेऊ शकत का? सिबल म्हणाले होय

शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह धनुष्यबाण मुळ पक्षातून बाहेर पडलेल्या गटाला दिल्याने अनेक कायदेशीर वाद निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर युक्तीवाद करताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिबल यांनी युक्तीवाद करताना म्हणाले, राज्यघटनेतील १० व्या परिशिष्टानुसार मुळ पक्षातून बाहेर पडलेल्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता …

Read More »

सर्वोच्च न्यायालयः ठाकरे गट विरूध्द शिंदे प्रकरणी नबाम रेबियाचा निर्णय नेमका कसा लागू होतो ? गुरूवारी सकाळपासून पुन्हा सुनावणी

काल मंगळवारी ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत नबाम रेबिया प्रकरणाचे मापदंड लागू होऊ शकत नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डि.वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केले. तसेच नबाम रेबिया प्रकरण या महाराष्ट्रातील राजकिय घडामोडींशी लागू होते अशी विचारणा करत त्याचे स्पष्टीकरण देण्यास शिंदे गटाच्या वकीलांना सूचना केली. त्यानुसार …

Read More »

निवडणूक आयोगः ठाकरे-शिंदेच्या युक्तीवादानंतर ३० जानेवारीला पुढील सुनावणी सोमवारी लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश

शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्यबाण कोणाचे यावरून कायदेशीर लढाई शिंदे गट आणि ठाकरे गटात सुरु आहे. तसेच सध्या या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगात सध्या सुनावणी सुरु आहे. आज तिसऱ्या दिवशी सुनावणीच्या दिवशी ठाकरे गटाची बाजू कपिल सिब्बल व देवदत्त कामत यांचा युक्तीवाद झाल्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि …

Read More »

शिंदे गटाचे वकील म्हणाले, शिंदेंना प्रतिनिधी सभेतील ९० सदस्यांचा पाठिंबा प्रतिनिधी सभेची बैठक घेण्याचा अधिकार शिंदेंनाही

शिवसेनेतील फुटीनंतर धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष कोणाचा यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात आपलाच गट हा खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर या महिन्यातील तिसऱ्या सुनावणी वेळी ठाकरे गटाने शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी कशाच्या आधारावर झाला याविषयी …

Read More »

ठाकरे गटाचे वकील म्हणाले, शिंदे गटाचा वाद म्हणजे लोकशाहीची थट्टा आयोगासमोर युक्तीवाद करताना कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या अधिकारावरून निवडणूक आयोगात पोहोचलेला वादावर १७ जानेवारीनंतर आज २० जानेवारी रोजी ठाकरे गट आणि शिंदे गटाने आज युक्तीवाद केला. या आधीच्या सुनावणी वेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आपल्याला आणखी युक्तीवाद करायचे असल्याचे सांगत पुढील तारखेची मागणी केली होती. त्यानुसार आज कपिल सिब्बल यांनी …

Read More »

निवडणूक आयोगः शिंदे गटाचं ग्राह्य धरा आणि चिन्हाचा निर्णय घ्या महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद करत आम्हाला पाठिंबा असल्याचा केला दावा

शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबतची सुनावणी निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी बाजू मांडण्यास सुरूवात केली आहे. तर महेश जेठमलानी हे शिंदे गटाची बाजू मांडत आहेत. फूट कपोल कल्पित आहे त्याने पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं. त्यावर महेश जेठमलानी यांनी …

Read More »

निवडणूक आयोगः ठाकरे गटाने युक्तीवादावेळी शिंदे गटाच्या नियुक्त्यांवर घेतला आक्षेप २० जानेवारीला पुन्हा होणार सुनावणी

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी रोजी होईल, असा निर्णय निवडणूक आयोगाने …

Read More »