भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी नांदेड येथील गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, अमित शाह यांनी नांदेड येथील जाहिर सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच गेल्या …
Read More »भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील वेळापत्रक राहणार असे
जवळपास एक महिन्याहून अधिक काळ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यांत्रा कन्याकुमारी, तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणानंतर आता ही यात्रा महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रवेश करत आहे. या यात्रेचा पहिला मुक्काम नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे राहणार आहे. तसेच ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अर्थात जवळपास १४ दिवस …
Read More »जयंत पाटील म्हणाले; कुणाला किती खाती, कुणाचे किती मंत्री यातच सरकारचा वेळ संकटात सापडलेल्या जनतेसाठी तात्काळ मदतकार्य सुरू करा
महाराष्ट्रातील जनतेसमोर निसर्गाने संकट उभे करुन मोठे प्रश्न निर्माण केले आहेत मात्र अजूनही सरकार जाग्यावर आलेले नाही त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन करुन लोकांना तात्काळ मदतकार्य सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे नांदेड दौऱ्यावर …
Read More »अशोक चव्हाण यांच्याकडून रस्त्याच्या नावाखाली निधीचा गैरवापर नांदेड महापालिका निवडणुकीसाठी अशोक चव्हाणांकडून जनतेची दिशाभूल- खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
नांदेड महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अशोक चव्हाण यांनी सत्ता जाणार हे निश्चित असतानाही १५० कोटींच्या कामांना मान्यता दिल्याची घोषणा केली. अशा घोषणा करून अशोक चव्हाण हे नांदेडच्या जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते …
Read More »मराठवाड्यातील या तीन जिल्ह्यांमधील पाणीप्रश्न निकाली निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी-जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरण्यास मंजुरी दिली. निर्णयामुळे यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील काही भागास अधिकचे पाणी उपलब्ध होईल अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देत या निर्णयाच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दृष्टीने दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास …
Read More »मराठवाड्याच्या विकासासाठी लवकरच सर्व जिल्हाधिकारी, विभागप्रमुखांची बैठक केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती
नांदेड : प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला अर्थ राज्यमंत्रिपद दिले आहे. मी मराठवाड्यातील लातूर येथील भूमिपुत्र असून औरंगाबाद येथे स्थायिक झालो आहे. येणार्या अर्थसंकल्पात मराठवाड्याला झुकते माप देण्याचा माझा प्रयत्न राहिल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. ते जन आशीर्वाद यात्रेनिमित्त …
Read More »मुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी हवामान खात्याचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालचा समुद्र आणि लगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात आजपासून १५ जून पर्यंत पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देत मुंबई कोकणसह पुणे, परभणी, सातारा, हिंगोली उस्मानाबाद, नांदे़ड लातूर भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग …
Read More »राज्यातल्या या नऊ जिल्ह्यांबाबत केंद्राने व्यक्त केली चिंता कोरोनाच्या वाढत्या संख्येबाबत लॉकडाऊन लागण्याची शक्यता
नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील नऊ जिल्ह्याबाबत चिंता व्यक्त केली असून या जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोनाची संख्या वाढत असल्याबाबत राज्य सरकारने ठोस उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी व्यक्त केली. देशातील कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर नवी दिल्लीत आयोजित पत्रकार …
Read More »मुंबई समिश्र तर राज्यात भारत बंदला चांगला प्रतिसाद भाजपा वगळता सर्वपक्षियांचा सहभाग
मुंबईः प्रतिनिधी केंद्राच्या शेती कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदला भाजपातेर सर्व पक्षियांनी संपूर्ण पाठिंबा देत मुंबईसह राज्यातील अनेक भागात आंदोलन करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. या बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह राज्यातील अनेक रिक्षा संघटनांनी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आपला व्यवसाय बंद ठेवून बंदमध्ये सहभागी होत शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिला. विशेषतः …
Read More »मंत्री वडेट्टीवारांनी शेतकऱ्यांना दिले हे आश्वासन वेळप्रसंगी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू सांगत लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश
नांदेड : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे. शासन स्तरावर पंचनामे पूर्ण झाले असून आता तीन दिवसांपूर्वी पुन्हा अतिवृष्टी झाली त्याचेही पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे युद्धपातळीवर लवकरात लवकर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला …
Read More »
Marathi e-Batmya