आता देवस्थाने व मंदिरे उघडा भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी
कोरोना लॉकडाऊन मध्ये बंद केलेली सर्व मंदिरे तातडीने उघडण्याची मागणी आज भाजप मुंबईचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मंगलप्रभात लोढा म्हणतात की, राज्यात मिशन बिगीन अगेन सुरू झाले आहे. त्याअंतर्गत बाजारपेठ काही निर्बंधांसह पुन्हा हळू हळू सुरू होत आहेत. त्याचबरोबर राज्यात आणि शहरांत बस वाहतूक सुरू केली. प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांनुसार सरकार लवकरच हॉटेल आणि उपाहरगृहे सुरू करण्यास परवानगी देत आहे.
त्यापार्श्वभूमीवर भारतीय समाज देवाधर्माशी जोडला गेला आहे. आजच्या संकट काळात या समाजाला मानसिक धार्मिक आधार मिळण्याची गरज आहे. त्यामुळे लोकांसाठी बंद केलेली सर्व मंदिरे तातडीने सामाजिक अंतराचे ध्यान राखत खुली करावी अशी मागणी त्यांनी केली.

About Editor

Check Also

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज महाराष्ट्र प्रदेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *