पंचनामे लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खिशात काहीतरी मदत गेली पाहिजे, असा सरकारचा विचार असून कॅबिनेट उपसमितीचीही त्याबाबत शिफारस असल्याचे महसूल मंत्री व दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,” राज्यातील दुष्काळी परिस्थितीत ट्रिगर-वनमध्ये न आलेल्या मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची स्थिती असलेल्या …
Read More »‘नो मॅपिंग’ व ‘लॉजिकल डिस्क्रेपन्सी’ मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीची आवश्यकता नाही बीएलओ घरी जाऊन कागदपत्रे घेणार; व्हॉट्सॲपद्वारेही पुरावे सादर करण्याची सुविधा
भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित निर्देशांनुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेत ‘नो मॅपिंग’ किंवा ‘लॉजिकल डिस्क्रेपन्सी’ असलेल्या आणि सुनावणीसाठी नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे व पुरावे जमा करून घेतील. तसेच, संबंधित मतदारांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही बीएलओ …
Read More »दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त अन्य १९ तालुक्यांत सर्वेक्षण करण्याचे निर्देश प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा
राज्य शासनाने २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. ट्रिगर १ तालुक्याव्यतिरिक्त आणखी १९ तालुक्यात दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधी यांच्याकडून शासनास करण्यात आली आहे. या तालुक्यातील प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण, ग्राउंड ट्रथिंग करून अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावेत, अशा सूचना मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आल्या …
Read More »मुकुल वासनिक यांची टीका, ज्ञानेशकुमार हे मोदींचे प्यादे, माजी पंतप्रधानांवर केस चालते पण निवडणूक आयुक्तांवर नाही लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी देशात परिवर्तनाची गरज, परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल: डॉ. सिरिवेल्ला प्रसाद
देशाची लोकशाही व संविधान संपवण्याची प्रक्रिया मागील काही वर्षापासून सुरु आहे. स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य संपुष्टात आणले आहे, निवडणूक आयोगाला भाजपाचे एजंट बनवले आहे, देशात चोरांचे राज्य आहे. मतचोरी, सीटचोरी, आमदार खासदारांची चोरी, देशाची संपत्ती चोरी, तरुणांच्या नोकऱ्यांची चोरी, विद्यार्थ्यांच्या परीक्षा चोरी केल्या जात आहेत. जे देशात होत आहे तेच महाराष्ट्रातही …
Read More »अभिजीत दीपके यांचा निर्धार, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घेईपर्यंत शांत बसणार नाही आंदोलनासाठी मी तुरुंगात गेलो तरी पुन्हा येईन, पुन्हा येईन
मतचोरी प्रकरणी इंग्रजी वर्तमान पत्र द इंडियन एक्सप्रेस मध्ये यासंदर्भातील वृत प्रकाशित होत निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्तांचा विरोध असतानाही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानी पद्धतीने एसआयआर आणि मतदारांची नावे डिलीट केली. त्यावरून देशातील प्रमुख विरोधी पक्षांसह जेन झीनेही निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन …
Read More »राहुल गांधी यांचा सवाल, फॉर्म ६ मध्ये बदल करण्याचे आदेश कोणी दिले ? अर्जातील बदल करण्यासाठी टीसीएसवर काही दबाव होता का अशी विचारणा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी भारतीय निवडणूक आयोगाकडे ‘फॉर्म ६’ (नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरला जाणारा ऑनलाइन फॉर्म) मध्ये केलेल्या वादग्रस्त बदलांबाबत स्पष्टीकरण मागितले. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ला (TCS) हे बदल लागू करण्याचे आदेश कोणी दिले आणि कंपनीतील कोणी याला मंजुरी दिली, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. हे बदल करण्यासाठी …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल, मुंढवा जमिन प्रकरणातून पार्थ पवार यांचे नाव का वगळले ? मुंडवा जमिन प्रकरणात ९९ टक्के हिस्सा पार्थ पवार यांचा आणि १ टक्का हिस्सा निलंबित तहसीलदाराचा
मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी, जमीन खरेदी करणाऱ्या ‘अमाडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ (Amadea Enterprises LLP) या कंपनीत ९९ टक्के हिस्सा असूनही राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना आरोपींच्या यादीतून का वगळण्यात आले, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी महाराष्ट्र सरकारला विचारला [सूर्यकांत येवले विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर]. मुंढवा जमीन घोटाळ्यातील आरोपींपैकी एक असलेले …
Read More »पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, प्लायदुबई विमानातील त्या सह वैमानिकाचे धर्मांधीकरण झाले होते तो सहवैमानिक ओमानचा नागरिक होता
तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’ (flydubai) विमानावर हवेत झालेल्या हल्ल्यात १८० प्रवाशांचे (ज्यांत प्रामुख्याने इस्रायली नागरिक होते) प्राण धोक्यात आले होते. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दावा केला की, भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला करणाऱ्या सह-वैमानिकाचे (को-पायलट) कट्टरपंथी विचारसरणीनुसार धर्मांधीकरण झाले होते. ‘फॉक्स न्यूज’ला …
Read More »स्रीधर वेंबू यांची माहिती, झोहो स्वतःची क्लाऊड सेवा वापरते आता मुलांना मोफत देणार एडब्लूएस आणि गुगल क्लाऊड सेवेचा वापर नाही
झोहोचे (Zoho) सह-संस्थापक स्रीधर वेंबू यांनी सांगितले की, कंपनीने AWS आणि Google Cloud सारख्या मोठ्या सेवा प्रदात्यांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःची क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर (पायाभूत सुविधा) विकसित करण्याचा निर्णय घेतला. झोहो आता ‘कॅटलिस्ट’ (Catalyst) या आपल्या ‘सर्व्हरलेस प्लॅटफॉर्म’द्वारे ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्ससाठी उपलब्ध करून देत आहे आणि ती विद्यार्थ्यांसाठी मोफत देण्याची योजना आखत …
Read More »युपीआयच्या एमडीआर शुल्कामुळे ७६ टक्के ग्राहक कॅशकडे वळाले २००० रु.च्या वरील खरेदीसाठी रोख रक्कम खर्च करण्याकडे कल
व्यापाऱ्यांसाठी बऱ्याच अंशी मोफत पेमेंट पर्याय म्हणून गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या युपीआय UPI सेवेसमोर १५ ऑक्टोबरपासून एक आव्हान उभे राहणार आहे; कारण २,००० रुपयांवरील ‘पर्सन-टू-मर्चंट’ (ग्राहक ते व्यापारी) व्यवहारांवर ०.४% ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (MDR) लागू होणार आहे. ‘लोकलसर्कल्स’च्या (LocalCircles) एका नवीन सर्वेक्षणानुसार, जर व्यापाऱ्यांनी हा खर्च ग्राहकांवर लादला, तर …
Read More »
Marathi e-Batmya