वाढदिवसाला फलक, हारतुरे नको तर निधीला देणगी द्या, रक्तदान-प्लाझ्मा दान शिबिरे घ्या वाढदिवस साजरा करणार नसल्याची मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी

आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत‘, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस केले आहे.

आपल्याला दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहोत. २७ जुलैस आपल्या वाढदिवशी कुणीही जाहिरात फलकभित्तीपत्रके लाऊ नये किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहनही त्यांनी केले. 

गेल्या चार महिन्यांपासून राज्य सरकार नागरिकस्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत असून आपल्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाहीउलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे असल्याचे सांगत वाढदिवसाच्या निमित्ताने वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीतमोठ्या प्रमाणावर रक्तदान ,प्लाझ्मा दान करावे असे आवाहन त्यांनी केले.

 

About Editor

Check Also

कोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरू विविध योजनांसह ५० कोटींचा निधी मंजूर

ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा वृद्धापकाळ सुखाचा आणि सन्मानाचा घालवता यावा, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *