चाकरमानी महिलांसाठी खुषखबर ! उद्यापासून लोकलने प्रवास करता येणार परंतु ठराविक कालावधीतच, राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी

मागील सात महिन्यापासून राज्य सरकारने परवानगी दिलेल्यांनाच मुंबई उपनगरात लोकलने प्रवास करता येत होता. मात्र आता या परवानगी असलेल्यांबरोबरच सर्वसाधारण महिला चाकरमानींनाही उद्यापासून अर्थात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासून लोकलने प्रवास करण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी त्या कालावधीतच प्रवास करता येणार आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ७ नंतर रात्रो लोकल सेवा बंद होईपर्यत सर्वसाधारण महिलांना प्रवास करता येणार आहे. इतर कालावधीत राज्य सरकारने निर्धारीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वे लोकलने प्रवास करण्याची परवानगी कायम राहणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले.

About Editor

Check Also

कल्याण जवळ झालेल्या अपघाताबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांचे संवेदनशील निवेदन कमी क्षमतेच्या वाहनात जास्तीचे प्रवाशी, ११ प्रवाशांचा मृत्यू

आज १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:४५ वाजण्याच्या सुमारास कल्याण–मुरबाड–माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *