हल्ला करणारा आरोपी म्हणतो, मोठा राजकिय नेता होण्यासाठी ओवेसींवर हल्ला पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीची कबुली

मराठी ई-बातम्या टीम

एआयएमआयचे प्रमुख तथा लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासह त्यांच्या ताफ्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या सचिन या आरोपीने ओवेसींना जीवे मारण्यासाठीच त्याचा मित्र असलेल्या शुभम या मित्रासोबत कट रचल्याची कबुली पोलिसांसमोर दिली.

खासदार असदुद्दीन ओवेसी हे आपल्या वाहनाने उत्तर हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी ओवेसींवर हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. याप्रकरणी सचिन आणि शुभम या दोघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक काळापासून ते हल्ल्याची तयारी करत होते, अशी माहिती समोर आली. त्यातच आता ओवेसी यांना जीवे मारण्यासाठीच हा हल्ला केल्याची कबुलीही आरोपीने दिली.

मुख्य आरोपी सचिनने सांगितले की, त्याला मोठा राजकीय नेता व्हायचे आहे आणि ओवेसीचे भाषण ऐकून तो अस्वस्थ झाला. त्यामुळेच त्याने त्याचा जवळचा मित्र शुभमसोबत ओवेसीच्या हत्येचा कट रचला होता, असा खुलासा त्याने पोलिसांच्या चौकशीत केला.

मी जेव्हा ओवेसींवर गोळीबार केला तेव्हा ते खाली वाकले. त्यामुळे मी खाली गोळी झाडली आणि मला वाटले की त्यांना गोळी लागली आहे. मग मी पळून गेल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

ओवेसींवर हल्ला करण्याची योजना अनेक दिवसांपासून करत होते सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून होतो आणि हल्ला करण्याची संधी शोधत त्यांच्या अनेक सभांना गेले होते. मात्र, गर्दीमुळे ते होऊ शकलं नाही. नंतर जेव्हा मला कळले की ते मेरठहून दिल्लीला जाणार आहे, तेव्हा मी त्यांच्या आधी टोलगेटवर पोहोचलो आणि गाडी येताच गोळीबार केल्याची कबुलीही त्यांने पोलिस यंत्रणांना दिली.

दरम्यान, ओवेसी यांनी हल्ल्यानंतर दिलेली झेड सुरक्षा नाकारत म्हणाले की, मला झेड दर्जाच्या सुरक्षेची गरज नाही. मला ए दर्जाचे नागरिक होण्याची इच्छा आहे. मला जगायचे आहे, बोलायचे आहे. जेव्हा या देशातील गरीब सुरक्षित असतील, त्यावेळीच मी सुरक्षित असेल. माझ्या कारवर हल्ला करणाऱ्यांना घाबरायची मला गरज नाही. सरकार या हल्लेखोरांवर ‘यूएपीए’नुसार का कारवाई करत नाहीत असा सवालही त्यांनी यावेळी केला.

About Editor

Check Also

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार अंबाझरी तलावाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *