तापसीचा डबल धमाका दोन चित्रपटांमध्ये बनली हॅाकी खेळाडू

मुंबई : प्रतिनिधी

दक्षिणेकडून हिंदी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर एका मागोमाग एक धडाकेबाज भूमिका साकारत अभिनेत्री तापसी पन्नूने आज एक वेगळीच उंची गाठली आहे. त्यामुळेच आज तापसीचा सिनेमा म्हणजे काहीतरी वेगळं आणि अनोखं पाहायला मिळणार असं समीकरणच बनून गेलं आहे. तापसीही नेहमी आपल्या प्रोजेक्ट्ससाठी वाट्टेल ती मेहनत घ्यायला तयार असते. आता ती लवकरच हॅाकी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. तापसीने एक नव्हे तर चक्क दोन चित्रपटांमध्ये हॅाकी खेळाडूच्या भूमिका साकारली आहे.

तापसीला हॅाकी हा खेळ खूप आवडतो. बालपणी हॅाकी खेळल्याने या खेळाशी तिचे वेगळेच ऋणानुबंध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तापसीने नुकतंच एका तेलुगू चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. ‘सूरमा’ नावाच्या या चित्रपटात तिने हॅाकी खेळाडूची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिच्या जोडीला दिलजीत दोसांज मुख्य भूमिकेत आहे. या तेलुगू चित्रपटानंतर तापसीने लगेचच विकी कौशल आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत ‘मनमर्जीयां’ या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. या चित्रपटातही ती हॅाकी खेळाडूची भूमिका साकारतेय. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचं पहिलं शेड्यूल सुरू झालं आहे. ‘मनमर्जीयां’मध्ये तापसी प्रोफेशनल हॅाकी प्लेअर बनली नसली तरी ‘सूरमा’मध्ये मात्र तिच्यातील प्रोफेशनल खेळाडूची झलक नक्कीच पाहायला मिळणार नाही.

About Editor

Check Also

ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध मान्यवर आणि चाहत्यांनी घेतले अखेरचे दर्शन

ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *