कंगना, मेंटल है क्या कंगना-राजकुमारची पागलपंती

मुंबई : प्रतिनिधी

अभिनेता राजकुमार रावने भारतीय सिनेसृष्टीत आज स्वत:ला सिद्ध केलं आहे. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यासाठी आपण सक्षम असल्याचं दाखवून दिलं आहे. यामुळेच आज एकीकडे तो कलात्मकतेकडे झुकणाऱ्या सिनेमांमध्येही दिसतो आणि मसालापटांमध्येही आघाडीच्या नायिकांसोबत रमतो. लवकरच तो बॅालिवुडची आघाडीची नायिका असणाऱ्या कंगना रणौतसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘मेंटल है क्या’असं शीर्षक असलेल्या या चित्रपटात प्रेक्षकांना दोघांची पागलपंती पाहायला मिळणार आहे.

‘मेंटल है क्या’ या चित्रपटाची फर्स्ट लुक पोस्टर्स नुकतीच रिव्हील करण्यात आली आहेत. या पोस्टर्समध्ये राजकुमार आणि कंगनाचे धक्कादायक लुक पाहायला मिळतात. एखादी वेडी व्यक्ती ज्याप्रकारे वेडे चाळे करते तसे काहीसे या पोस्टरमध्ये कंगना आणि राजकुमार करताना दिसतात. या चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये कंगना आपल्या जिभेला पेटलेलं लायटर लावताना दिसते, तर राजकुमार आपल्या कपाळावर पेटती सिगरेट विझवताना दिसतो. कंगना आणि राजकुमारचे हे वेडे चाळे पाहिल्यावर या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळेल याबाबतची उत्सुकता नक्कीच वाढते. कंगनाला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा शीर्षक ऐकल्यावरच तिच्या मनात या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली. पटकथा ऐकल्यावर आपण हा ‘सायको’ चित्रपट करायचाच असा निश्चय तिने केल्याचं समजतं.

या चित्रपटाच्या निमित्ताने कंगना, राजकुमार आणि एकता कपूर प्रथमच एकत्र आले आहेत. बालाजी मोशन पिक्चर्सने कर्मा मीडिया अँड एन्टरटेन्मेंटच्या सहाय्याने या चित्रपटाची प्रस्तुती केली असून शोभा कपूर, एकता कपूर आणि शैलेश आर. सिंग या चित्रपटाचे निर्माते आहेत. दिग्दर्शक प्रकाश कोवेलमुडी या चित्रपटाचं दिग्दर्शन करीत आहेत.

About Editor

Check Also

आशा भोसले यांचा स्वर कायमचा शांत, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना शोक उद्या होणार अंत्यसंस्कार

ख्यातनाम आयकॉनिक पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *