दिवाळी सणानिमित्त एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोंबरला पगार रोखून धरलेली रक्कमही अदा करण्याचे निर्देश

दिवाळी सणानिमित्त आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचा पगार चालू महिन्यातच देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचे वेतन जारी करण्यात यावे असे आदेश एसटी महामंडळाने आज जारी केले आहेत. त्यानुसार एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोंबर २०२४ रोजी ऑक्टोंबर महिन्याचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील अनेक वर्षापासून तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळाला मासिक वेतन देणेही अवघड बनत चालले होते. त्यामुळे तोट्यात आलेल्या एसटी महामंडळाला फायद्यात आणण्यासाठी सरकारी पातळीवरून विविध योजना आखण्यात आल्या होत्या. मात्र दोन-तीन वेळा राज्य सरकारकडून निधी देऊनही एसटी महामंडळाच्या तोट्यात कोणताही फरक पडत नव्हता. मात्र राज्यातील महायुती सरकारने महिलांना मोफत प्रवास आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास प्रवास योजना सुरु केली. तसेच मध्यंतरीच्या काळात या योजनांचा निधी राज्य सरकारने एसटी महामंडळाला दिली.

राज्य सरकारकडून या निधीचे पैसे दिल्याने एसटी महामंडळाच्या तिजोरीत थोडीफार शिल्लक रहायला सुरुवात केली. त्यामुळे एसटी महामंडळ काही प्रमाणात फायद्यात आल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातच दिवाळीचा सण आल्याने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी महिना संपविण्यापूर्वीच वेतनाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील सर्व एसटी महामंडळाच्या डेपोंना आदेश जारी करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाने वेतनासंदर्भात जारी केलेले हेच ते पत्रक

About Editor

Check Also

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *