अपघातात जखमी झालेले नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर नवाब मलिक यांच्यावर दुःखाचा डोंगर

यंदाची दिवाळीचा सण आणि विधानसभेच्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेसचे मानखुर्द शिवाजीनगर मधील उमेदवार नवाब मलिक यांना काही धार्जिण होताना दिसत नाही. आधीच काही काळ भाजपाच्या आरोपामुळे तुरुंगवास भोगाव लागलेल्या नवाब मलिक यांना कसेतरी जामीन मिळाला. त्यास काही महिन्यांचा अवधी लोटत नाही तोच मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवारीला भाजपाने विरोध सुरु करण्यास सुरुवात केली. त्यावर कसा तरी मार्ग काढत असतानाच काही दिवसांपूर्वी अपघातात जखमी झालेले मलिक यांचे जावई समीर खान यांचे आज निधन दुःखद निधन झाल्याचे वृत्त हाती आले आहे.

काही दिवसांपूर्वी समीर खान हे अपघातात जखमी झाले होते. अपघातानंतर समीर खान यांच्यावर कोहिनूर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. तसेच समीर खान यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत होते. नवाब मलिक यांची कन्या निलोफर याचे ते पती होते. समीर खान यांचे निधन झाल्याची माहिती नवाब मलिक यांनी स्वतः एक्सवर ट्विट करत दिली.

काही दिवसांपूर्वी समीर खान आणि त्यांची पत्नी निलोफर हे कुर्ल्यातील घराजवळ असलेल्या क्रिटीकेअर हॉस्पीटल येथे रुटीन चेकअप साठी गेले होते. चेकअप केल्यानंतर समीर खान यांनी ड्रायव्हरला गाडी घेऊन रूग्णालयाच्या गेटवर येण्यास सांगितले. समीर खान यांच्या सांगण्यानुसार ड्रायव्हरने गाडी आणली खरी. पण समीर खान यांच्या जवळ आल्यानंतर ड्रायव्हरने ब्रेकवर पाय ठेवण्याऐवजी गाडीच्या अॅक्सिलेटरवर पाय पडला. त्यात समीनर खान हे त्या गाडीसोबत फरफटत नेले. तसेच या गाडीने काही दुचाकींनाही धडक दिली. त्यामुळे समीर खान यांना दुखापत झाली.

या अपघातात समीर खान यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला दुःखापत झाली. त्यामुळे समीर खान यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर या दुर्घटनेत नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर यांच्या हाताला दुखापत झाली. मात्र त्या यातून बचावल्या. समीर खान यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते. त्यांना वाचविण्याचे प्रयत्न डॉक्टरांनी केले. मात्र समीर खान यांची मृत्यूसोबतची झुंज आज संपली.

यंदाची दिवाळीचा सण आणि विधानसभेच्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेसचे मानखुर्द शिवाजीनगर मधील उमेदवार नवाब मलिक यांना काही धार्जिण होताना दिसत नाही. आधीच काही काळ भाजपाच्या आरोपामुळे तुरुंगवास भोगाव लागलेल्या नवाब मलिक यांना कसेतरी जामीन मिळाला. त्यास काही महिन्यांचा अवधी लोटत नाही तोच मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवारीला भाजपाने विरोध सुरु करण्यास सुरुवात केली. त्यावर कसा तरी मार्ग काढत असतानाच काही दिवसांपूर्वी अपघातात जखमी झालेले मलिक यांचे जावई समीर खान यांचे आज निधन दुःखद निधन झाल्याचे वृत्त हाती आले आहे.

काही दिवसांपूर्वी समीर खान हे अपघातात जखमी झाले होते. अपघातानंतर समीर खान यांच्यावर कोहिनूर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. तसेच समीर खान यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत होते. नवाब मलिक यांची कन्या निलोफर याचे ते पती होते. समीर खान यांचे निधन झाल्याची माहिती नवाब मलिक यांनी स्वतः एक्सवर ट्विट करत दिली.

काही दिवसांपूर्वी समीर खान आणि त्यांची पत्नी निलोफर हे कुर्ल्यातील घराजवळ असलेल्या क्रिटीकेअर हॉस्पीटल येथे रुटीन चेकअप साठी गेले होते. चेकअप केल्यानंतर समीर खान यांनी ड्रायव्हरला गाडी घेऊन रूग्णालयाच्या गेटवर येण्यास सांगितले. समीर खान यांच्या सांगण्यानुसार ड्रायव्हरने गाडी आणली खरी. पण समीर खान यांच्या जवळ आल्यानंतर ड्रायव्हरने ब्रेकवर पाय ठेवण्याऐवजी गाडीच्या अॅक्सिलेटरवर पाय पडला. त्यात समीनर खान हे त्या गाडीसोबत फरफटत नेले. तसेच या गाडीने काही दुचाकींनाही धडक दिली. त्यामुळे समीर खान यांना दुखापत झाली.

About Editor

Check Also

उदय सामंत यांचे आश्वासन, मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार विधान परिषदेत अर्धातास चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

मुंबईमध्ये वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *