राज्यात भाजपाच्या फोडा फोडीच्या राजकारणामुळे धमक्यांची नवी संस्कृती रूजवली असतानाच काल रात्री एका अमराठी नावाच्या शुक्लाने एकाच सोसायटीत राहणाऱ्या मराठी माणसाला मारण्यासाठी बाहेरची मुलं-माणसे बोलावून आणत मारहाण केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आली. तसेच अमराठी शुक्ला हा मराठी द्वेष्टा असल्याचेही सांगण्यात येत आहे.
काल संध्याकाळी सोसायटीतील मराठी कुटंबिंय कळमुद्रे पाटील यांच्या घरात पूजा करताना लावलेल्या धुपाचा धुर त्यांच्या घरात जातो. त्यामुळे कळमुंद्रे पाटील कुटुंबियांशी या अमराठी अभिषेक शुक्ला यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यावेळी शेजारीच राहणाऱ्या अभिजीत देशमुख याच्यावरच अभिषेक शुल्का याने हल्ला करत मारहाण केली. या मारहाणीत अभिजीत देशमुख यांना चांगलाच मार लागला असून त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागल्याचे दिसून येत आहे.
त्यानंतर पोलिस स्टेशनला यासंदर्भात अभिजीत देशमुख हे तक्रार दाखल करण्यासाठी गेले. पण पोलिस स्टेशनमध्ये बराच काळ अभिजीत देशमुख यांना बसवून ठेवले. मात्र अभिषेक शुक्ला यांची मात्र पोलिसांनी सरबराई केल्याचा आरोप अभिजीत देशमुख याने केला.
या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि यासंदर्भातील मुद्दा शिवसेना उबाठाचे आमदार सुनिल प्रभू यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारने दखल घेत याप्रकरणी कारवाईला सुरुवात केली.
दरम्यान अभिषेक शुक्ला हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाशी संबधित असून तो महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाशी संबधित असल्याने या पदाच्या जोरावर मराठी माणसांचा द्वेष करत होता अशी माहितीही पुढे येत आहे.
या संदर्भातील आणि राज्य सरकारच्या आश्वासनानंतर अखेर अखिलेश शुक्ला याने पोलिसांमध्ये आत्मसमर्पण केल्याचे सांगण्यात येत आहे.
Marathi e-Batmya