पालिकेच्या जुन्या इमारती आणि पुर्नविकासाच्या करारनाम्यावर नाममात्र शुल्क राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी
शहरातील मुंबई महानगरपालिकेच्या जून्या इमारती व चाळींच्या पुर्नविकासाला गती देण्यासाठी यानिमित्ताने होणाऱ्या त्रिपक्षीय करारावर फक्त १००० हजार रूपयांचे नाममात्र शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयामुळे महापालिकेच्या जून्या इमारती आणि चाळींच्या पुर्नविकासाला गती मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या इमारती, चाळींचा पुर्नविकास होता सदर ठिकाणची नोंदणीकृत सहकारी संस्था, नियुक्त विकासक आणि मुंबई महापालिका यांच्या त्रिपक्षीय करार होणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम अनुसूची १ मधील अनुच्छेद ५ (ग-अ) नुसार आकारणी करण्यात येणार आहे.
यापूर्वी अशा इमारतींच्या पुर्नविकसित होणाऱ्या इमारतींसाठी सवलत देण्यात येत नव्हती. ती आता यापुढील इमारती चाळींच्या पुर्नविकास करारात मिळणार आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेच्या मे.हायके एएस यांच्यात सामंजस्य करार

मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक गरजांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *