Breaking News

जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला एकनाथ शिंदें यांचा मदतीचा हात एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत मुलांच्या कुटुबियांचे सांत्वन

शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या आफान अफसर इनामदार ( वय १०) आणि रीफत अफसर इनामदार ( वय ७) या चिमुकल्यांच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. नगरपालिका निवडणुकीवेळी जुन्नरमध्ये पचारासाठी आले असता त्यांना या दुर्दैवी घटनेबद्दल कळल्यानंतर त्यांनी ईनामदार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली होती. त्यानंतर …

Read More »

Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाची मुंबईजवळील समुद्रात मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय तेल तस्करीचा सागरी टोळीचा पर्दाफाश केला.

Indian Coast Guard

भारतीय तटरक्षक दलाने Indian Coast Guard एका धाडसी सागरी कारवाईत आंतरराष्ट्रीय तेल तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. शुक्रवारी समन्वित समुद्र-हवाई कारवाईद्वारे केलेल्या या कारवाईत तीन संशयास्पद जहाजांना रोखून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर तेल व्यापार उघडकीस आला. तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी संघर्षग्रस्त देशांमधून स्वस्त तेल आणि तेल-आधारित माल समुद्रमार्गे वाहतूक …

Read More »

Rohit Shetty firing case: २० जानेवारी रोजी स्कूटीवर मुंबईत आले होते आरोपी रोहित शेट्टी यांच्या घरी झालेल्या गोळीबाराच्याच्या घटनेत नवी माहिती आली बाहेर

Rohit Shetty firing case: The accused had arrived in Mumbai on a scooter on January 20.

मुंबईतील रोहित शेट्टीच्या Rohit Shetty घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे आणि आता या प्रकरणाचे गूढ हळूहळू उलगडत आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात मोठा कट उघड झाला आहे. पोलिसांनी सांगितले की बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा, मोठ्या प्रमाणात निधी आणि आंतरराष्ट्रीय संबंध असू शकतात. पोलिसांच्या मते, आरोपी सिद्धार्थ आणि समर्थ …

Read More »

BirdFluAlert : कावळ्यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूमध्ये बर्ड फ्लूचा इशारा… लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला

BirdFluAlert issued in Tamil Nadu after deaths of crows.

तामिळनाडूच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाने बर्ड फ्लूचा प्रसार ( BirdFluAlert ) रोखण्यासाठी जैवसुरक्षा आणि खबरदारीच्या उपाययोजनांबाबत एक सल्लागार जारी केला आहे. मोठ्या प्रमाणात कावळ्यांचे मृत्यू आणि एव्हीयन इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव होण्याची भीती यांच्या पार्श्वभूमीवर विभागाने हे पाऊल उचलले आहे. BirdFluAlert सार्वजनिक आरोग्य आणि प्रतिबंधात्मक औषध संचालनालयाने (डीपीएच) देखील एक सार्वजनिक …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भ’चे थाटात उद्घाटन

गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टिल हब, नागपुरात सोलर मॉडयुल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडली आहेत. निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरु आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे, या सर्व प्रयत्नांतून येत्या ५ …

Read More »

रामदास कदम यांचा आरोप, शरद पवारांना शह देण्यासाठी शपथविधी घडवून आणला महायुतीत वादाच्या ठिणग्या

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. अग्निसंस्काराच्या राख थंड होत नाही तोच तिसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला. हा शपथविधी करून घेण्यात आला यावरून टिकेची झोड उठली आहे. अजित पवारांच्या निधनाला ७२ तासही उलटत नाहीत, तोच सुनेत्रा …

Read More »

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी मतदानाची तयारी पूर्ण जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. ७) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या ७३१; तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७ हजार ४३८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्व मिळून एकूण २ कोटी ८ लाख २० हजार ७०२ …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे निर्देश, उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा एसटी महामंडळाला दिले निर्देश

“बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही अजित पवार यांच्या निधनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले. अजित दादांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, कुर्ला-ट्रॉम्बे मार्गालगतच्या झोपडपट्यांची पाडकाम मोहीम रद्द करा खासदार वर्षा गायकवाड यांची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

रेल्वे प्रशासनाने कुर्ला-ट्रॉम्बे मार्गालगतच्या ३१५४ झोपड्यांचे पाडकाम करण्याची नोटीस २७ जानेवारी २०२६ रोजी दिली असून या नोटीसीमुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. १० फेब्रुवारी २०२६ ते १२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान हे पाडकाम करण्यात येणार आहे. ही पाडकाम मोहीम रद्द करावी तसेच बाधित कुटुंबांसाठी कायमस्वरूपी पुनर्वसन योजना सुरू करावी, अशी मागणी मुंबई …

Read More »