सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ जागतिक घडामोडींचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर; दसरा दिवाळीच्या तोंडावर मोजावे लागणार अधिक पैसे

जागतिक घडामोडींचे परिणाम आता सोने-चांदीवर दिसून येत आहे. मध्य-पूर्वेतील अशांतता, युक्रेन-रशियात १९ महिन्यांपासून सुरु असलेले युद्ध याचा परिणाम आता सोन्या चांदीच्या किमतीवर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक वस्तू महागण्याची शक्यता आहे. त्यात सोने-चांदीने पहिला क्रमांक लावला आहे. गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या किमतीने उच्चांकी झेप घेतली होती. पण मंगळवारी किंमतीत मोठी घसरण आली होती. बुधवारी सोने-चांदीच्या किंमतींनी पुन्हा उसळी घेतली.

गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीचे दोन दिवस भावात घसरण दिसली. १६ ऑक्टोबर रोजी सोने ३४० रुपयांनी उतरले. तर १७ ऑक्टोबर रोजी सोन्यात १६० रुपयांची घसरण झाली. १८ ऑक्टोबर रोजी सोने ५४० रुपयांनी वधारले. तर २२ कॅरेट सोने ५५ हजार ५१० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ६० हजार ६५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. या आठवड्यात सोन्यात घसरण कायम राहिल्यास ग्राहकांचा दसरा हसरा होईल.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार २४ कॅरेट सोने ५९ हजार ८४० रुपयांपर्यंत घसरले. २३ कॅरेट ५९ हजार ६०० रुपये, २२ कॅरेट सोने ५४ हजार ८१३ रुपये, १८ कॅरेट ४४ हजार ८८० रुपये, १४ कॅरेट सोने ३५ हजार ००६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव ७२ हजार १९७ रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

About Marathi E Batmya

Check Also

Gold Price : सोने-चांदी खरेदीदारांना दिलासा; दरात २.५ टक्क्यांपर्यंत घसरण

मुंबई : सोमवारच्या सत्रात सोने आणि चांदीच्या दरात Gold Price घसरण झाली असून, सुरुवातीच्या व्यवहारात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *