Tag Archives: देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांचा सवाल मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, शिंदे म्हणाले, विरोधी पक्षनेते ठरवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

महायुती सरकार हे काम करणारे सरकार असून महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले आहे. या कामाची पोचपावती आगामी विधानसभा निवडणुकीत मतदार महायुतीला देतील,असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी व्यक्त केला. मुंबईत बुधवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणीला हात लावाल तर करेक्ट कार्यक्रम… महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीका

राज्यातील महायुती सरकारने सुरु केलेल्या माझी लाडकी बहिण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून सातत्याने आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लाडकी बहिण योजनेतील रकमेत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वाढ करणार असल्याचे जाहीर केले. तर दुसऱ्याबाजूला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डिसेंबर अखेरपर्यंत बहिणींना …

Read More »

मनोज जरांगे पाटील म्हणाले, वाटलं नव्हतं फडणवीस असं वागाल, आता तुमचा सुफडा… मराठ्यांच्या माय माऊलींनी रात्री मुलांला जवळ घेऊन बसा आणि विचार करा

निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होण्यापूर्वी मराठ्यांना आरक्षण जाहिर करा अन्यथा आम्ही आमची भूमिका आचारसंहितेनंतर जाहिर करू अशी घोषणा मराठा आरक्षण समर्थक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानुसार आज राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होत राज्यातील आचारसंहिताही आजपासून लागू करण्यात आली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान स्वप्निल कुसळे यास २ कोटी रुपये तर सचिन खिलारी यास ३ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द

पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आज खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, क्रीडा व …

Read More »

भाई जगताप यांची मागणी, बाबा सिद्दिकी यांच्या सुरक्षिततेतील त्रुटींची चौकशी करा महायुतीच्या काळात मुंबई ‘गुन्हेगारीत’ पुढारलेलं शहर

बदलापूरच्या घटनेत ताब्यात असलेल्या आरोपीला गोळ्या घालणारे पोलीस बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली तेव्हा कुठे होते, असा सवाल करत या प्रकरणाची चौकशीची मागणी करत महायुतीच्या काळात महिला सुरक्षित नाहीत, मुंबई शहर तर ‘गुन्हेगारीत’ दुसऱ्या क्रमांकावर आलं असल्याचा घणाघातही भाई जगताप यांनी केला. मुंबई काँग्रेसमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी …

Read More »

बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझे ते चांगले… त्यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आणि वेदनादायक

वांद्रे पूर्वचे आमदार आणि माजी आमदार बाबा सिद्धीकी हे त्यांच्या मुलाच्या कार्यालयातून पडल्यानंतर त्यांच्यावर तीन-ते चार आरोपींनी दुचाकीवर येत गोळीबार केला. या गोळीबारातच बाबा सिद्धीकी यांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर बाबा सिद्धीकी यांना लीलावती रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. या घटनेवरून महाविकास आघाडीतील विरोधकांनी महायुती सरकार आणि …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महाभ्रष्टयुती सरकारमुळे मुंबईसह महाराष्ट्र जंगलराज बाबा सिद्दीकींची गोळ्या घालून हत्या ही महाराष्ट्राच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना

राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर बेछूट गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला सुन्न करणारी आहे. वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या लोकप्रतिनिधीला वांद्र्यासारख्या भागात खुलेआम गोळ्या घातल्या जातात ही गंभीर बाब आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे कुठे? असा संतप्त सवाल करत भाजपा-शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुंबईसह महाराष्ट्र …

Read More »

सर्वोत्तम तंत्रज्ञानाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सायबर हल्ल्यापासून जनतेचे रक्षण करेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज असा हा महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प (Cyber Security Project) जनतेमधील सायबर हल्ल्याची भीती निश्चितच कमी करेल. हा प्रकल्प जनतेचे डिजिटल माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीचे प्रमाण कमी करण्यात, त्यांना दिलासा देण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील महापे औद्योगिक वसाहत …

Read More »

नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी महाराष्ट्राच्या प्रगतीची भरारी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचे सी – २९५ या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. या विमानांना वॉटर कॅनानद्वारे अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई ३० (Sukhoi) विमानानेही यशस्वी फ्लायपास केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे …

Read More »

राज्याला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटींचे कर हस्तांतरण; कल्याणकारी उपक्रमांना चालना सणासुदीच्या काळात भांडवल खर्चासाठी एक अग्रिम हप्त्याची रक्कम हस्तांतरित

महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्‍कमेचाही समावेश आहे. उर्वरित निधी रक्कम ही राज्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना १,७८,१७३ कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी करण्याचा …

Read More »