महाराष्ट्र सरकारच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईबाबतच्या नवीन आदेशात पूर्वीच्या तुलनेत कमी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शुक्रवारी एक नवीन सरकारी निर्णय (जीआर) जारी केला ज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत भरपाईसाठी पात्रता आणि प्रति हेक्टर अतिरिक्त आर्थिक मदत या निकषांवर जानेवारी २०२४ चा पूर्वीचा आदेश रद्द करण्यात …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, घोडबंदर-भाईंदर बोगदा प्रकल्पात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार राज्यात भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट, तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय, सर्व मोठ्या प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी करा
नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, या प्रकल्पातून दुसऱ्या निविदाधारकाचे टेंडर तांत्रिक बाबीचे कारण देत रद्द केले, या कामाचे टेंडर ज्या कंपनीला दिले ती मेघा इंन्फ्रास्ट्रक्चर कंपनी कोणाची आहे? यामागे काय गौडबंगाल होते? हे आता सर्वांसमोर आले आहे. एमएमआरडीएने आता टेंडर रद्द केल्याने हा …
Read More »आशिष शेलार यांचे आदेश, सर्व यंत्रणांनी १०० टक्के निधी खर्च करण्यासाठी काम करा मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठकीत दिले प्रशासनाला आदेश
जिल्हा नियोजन समिती ही एक महत्त्वाची समिती असून या समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आलेले प्रश्न हे जनतेच्या हिताचे असतात. तसेच शासनाचा निधी जनतेच्या कल्याणासाठी खर्च करण्याची जबाबदारी कार्यान्वयीन यंत्रणांवर असते. त्यामुळे सर्व विभाग प्रमुखांनी १०० टक्के निधी खर्च करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच लोकप्रतिनिधींनी या बैठकीमध्ये मांडलेले प्रश्न सोडवण्यासाठी सर्वच अधिकारी वर्गाने प्रयत्न …
Read More »सर्वोच्च न्यायालयात एमएमआरडीकडून मेघा इंजिनियअर्सची निविदा प्रक्रिया रद्द सर्वोच्च न्यायालयात एमएमआरडीएची माहिती- लार्सन अँड टुब्रोला दिलासा
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकी दरम्यान भाजपाला निवडणूक निधी देण्यासाठी इलेक्टोरल बॉण्डची खरेदी केली. त्या बदल्यात मेघा इंजिनिअरींगला ठाणे शहराला पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या बोगद्याचे कंत्राट लार्सन अँड टुब्रोला डावलून मेघा इंजिनियअर्सला देण्यात आले होते. या संदर्भात लार्सन अँड टुब्रोने आधी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निविदा प्रक्रियेला …
Read More »बांग्लादेशी नागरिकांची भाजपाकडून शोधाशोधा, पण त्यांच्याच आमदाराचा मतदारसंघ दिसेना आवाज उठविणाऱ्या कारकून दर्जाच्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांलाच गुंतविण्याचा वरिष्ठांकडून प्रयत्न
काही दिवसांपूर्वी मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातील ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविली. मात्र त्या मतदारसंघात बांग्लादेशी मुस्लिमांची संख्या वाढल्याने निकम यांचा पराभव झाला अशी आवई भाजपा नेत्यांनी उठविली. त्यानंतर भाजपाच्या मुंबईतल्या माजी खासदाराने अशा बांग्लादेशी नागरिकांची आणि त्यांच्या जन्म दाखल्याची शोध मोहिम हाती घेत मुंबईसह मालेगांव …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? भाजपा-मुस्लीम लीग का पुराना रिश्ता, मोहम्मद अली जिन्नांचा पक्ष व जनसंघाचे बंगालमध्ये युतीचे सरकार
पहलगाममध्ये ३०० किमी आत येऊन अतिरेक्यांनी निरपराध २६ नागरिकांची हत्या केली व परत गेले आणि आजपर्यंत ते सापडले नाहीत हे सरकारचे अपयश आहे. हे दहशतवादी तीनशे किलोमीटर आत आले कसे व परत गेले कसे? याचे उत्तर अमित शाह यांनी दिले नाही. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची संधी असतानाही ती सोडली व …
Read More »आशिष शेलार यांचा आरोप, उबाठाकडून मुंबईकरांशी १ लाख कोटींची बेईमानी मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून श्वेतपत्रिकेची मागणी
गेल्या २० वर्षात मुंबई महापालिकेने नालेसफाई, मिठी नदी, पुर परिस्थिती नियंत्रण, नाले बांधकाम, ब्रिमस्टोवँड यासाठी सुमारे १ लाख कोटी खर्च केले तरीही मुंबईतील परिस्थिती का बदलली नाही? याचे उत्तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी द्यावे अशी मागणी करत ही १ लाख कोटींची मुंबईकरांशी उबाठाने केलेली बेईमानी आहे, असा थेट आरोप …
Read More »शिवसेना उबाठा प्रणित कामगार संघटनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या सदस्य कंपन्यांच्या शेकडो कर्मचा-यांनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश कार्यक्रम भाजपा प्रदेश कार्यालयात झाला. या कार्यक्रमात रविंद्र चव्हाण यांची अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या वतीने रविंद्र चव्हाण यांची …
Read More »छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानने स्विकारला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाकडून प्रथमच राज्य प्रेरणागीत पुरस्कार घोषित झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण “वर्षा” या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित “अनादि मी.. अनंत मी…” या गीताकरिता राज्य शासनाच्या “छत्रपती …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, महायुती सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे मुंबई आणि मंत्रालय पाण्यात राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य पण महाभ्रष्ट युती सरकार मात्र अमित शहांच्या दौऱ्यात मग्न
राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे फक्त पावसाचं नव्हे, तर सरकारच्या उदासीनतेचं दर्शन आहे. निसर्ग स्वतःच सरकारला सावध करत आहे. महायुती सरकार हे भ्रष्टाचारी असून फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही, …
Read More »
Marathi e-Batmya