Tag Archives: भाजपा

नाना पटोले यांची मागणी, भारत जोडो यात्रेत सहभागी अर्बन नक्षली संघटनांची यादी द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्र लिहून मागणी

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत समाविष्ट झालेल्या विविध संघटना राज्याच्या व लोकशाहीच्या विरोधात काम करणाऱ्या व अर्बन नक्षलवाद माजवणाऱ्या होत्या, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणावरील केला आहे. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या त्या अर्बन नक्षली संघटनांची व त्या …

Read More »

मुंबई काँग्रेसची मंत्रालयावर तीव्र निदर्शने अमित शाह आणि भाजपाच्या गुंडगिरीचा धिक्कार

भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंत्रालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध करत, अमीत शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत, जयभीमच्या नाऱ्यांनी मंत्रालय परिसर दणाणून गेला होता. काल १९ डिसेंबरला भाजपाच्या सुमारे ४० गुंड कार्यकर्त्यांनी मुंबई कॉंग्रेस कार्यालयावर भीषण हल्ला केला. काठ्या, पेव्हर ब्लॉकने हल्ला करत …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, डॉ आंबेडकरांच्या अपमानाचे पाप लपवण्यासाठी भाजपाचे फेक नॅरेटीव्ह भाजपाकडूनच राहुल गांधींविरोधात कुभांड, भाजपा सदस्यांनीच राहुल गांधींना अडवले

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की केल्याचा कोणताही व्हिडिओ नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. भाजपाच्या पोटात होते तेच ओठावर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपाच्या मनात किती राग आहे ते उघड झाले. अमित शाहांचे …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर वाद-अमित शाह माफी मागाः काँग्रेस-इंडिया आघाडीकडून आंदोलन काँग्रेस आग्रही सलग दुसऱ्यादिवशीही परिसरात मोर्चाचे आंदोलन

राज्यसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा नेते अमित शाह यांनी माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस-इंडिया आघाडीकडून आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हाती धरत आंदोलन केले. तसेच विजय चौकापासून ते संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून एक मोर्चाही काढण्यात आला. दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, भाजपाच्या गुंडांचा भ्याड हल्ला, सरकारने हल्लेखोरांना अटक करावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानावर भाजपाची भूमिका म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’.

भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला, त्यावर माफी मागण्याऐवजी भाजपा गुंडगिरी करत आहे. संसदेत भाजपाच्या खासदारांनी दादागिरी केली, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांना संसदेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपाच्या …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, हल्ले करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचे पाप भाजपाला… काँग्रेस कार्यकर्ते जुलमी, अत्याचारी ब्रिटीशांना घाबरले नाहीत तर भाजपाच्या गुंडांना कशाला घाबरतील?

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदद्ल भारतीय जनता पक्षाच्या मनात काय भावना आहेत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यातून दिसून आलेच आहे. बाबासाहेबांबद्दलचा आकस, चिड व संताप या विधानातून व्यक्त झाला आहे. भाजपा व अमित शाह यांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याबद्दल माफी तर मागितली नाहीच उलट भाजपाच्या गुंडांनी मुंबई …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, डॉ आंबेडकरांना पराभूत करण्यात भाजपा-आरएसएसही अमित शाह यांना इशारा, आदरानेच बोला अन्यथा याद राखा

राज्यसभेत भाजपाचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमानकारक उल्लेख केला. त्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सीएसएमटी येथे मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा नेते अमित शाह यांना इशारा देत म्हणाले की, बाबासाहेबांबद्दल आदरानेच बोला …

Read More »

दिल्लीतील राड्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला तोडफोड सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या पोस्टरवर शाईफेक

दिल्लीत संसदेच्या आवारात भाजपा आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर राज्यातही तेथील घटनांचे पडसाद उमटत आहेत. भाजपाच्या खासदारांनी काँग्रेसच्या खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावरून संसदेच्या आवारात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र त्यानंतर भाजपाच्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्लाबोल करत काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड, सामानाची नासधुस करण्याचा प्रयत्न करत नेत्या …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, परभणी व बीडमधील घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाला कलंक भाजपा युती सरकारच्या काळात गुंडाराज; महाराष्ट्रात फोफावलेल्या गुंडाराजचा अंत करा

परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्या असून या हत्येप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही? राजकीय आशिर्वादाने महाराष्ट्रात …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर वादः सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की भाजपाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी लक्ष्य

विरोधी पक्ष आणि ट्रेझरी खंडपीठांमधील संबंध गुरुवारी (१९ डिसेंबर, २०२४) नवीन खालच्या पातळीवर पोहोचले आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हिंसाचाराचा अवलंब केल्याचा आरोप केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोप केला की भाजपा खासदार त्यांना धक्काबुक्की करत आहेत आणि त्यांना आणि इतर विरोधी खासदारांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखत असल्याचा आरोप …

Read More »