नाना पटोले यांचा इशारा, हल्ले करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचे पाप भाजपाला… काँग्रेस कार्यकर्ते जुलमी, अत्याचारी ब्रिटीशांना घाबरले नाहीत तर भाजपाच्या गुंडांना कशाला घाबरतील?

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदद्ल भारतीय जनता पक्षाच्या मनात काय भावना आहेत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यातून दिसून आलेच आहे. बाबासाहेबांबद्दलचा आकस, चिड व संताप या विधानातून व्यक्त झाला आहे. भाजपा व अमित शाह यांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याबद्दल माफी तर मागितली नाहीच उलट भाजपाच्या गुंडांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ले करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाचे पाप भाजपाला झाकता येणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या अशा भ्याड हल्ल्यांना काँग्रेस भिक घालणार नाही. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपाच्या गुंडशाही विरोधात काँग्रेस लढत राहणार. काँग्रसने जुलमी, अत्याचारी इंग्रजांशी लढून १५० वर्षांच्या ब्रिटीश सत्तेला देशातून हाकलून लावले व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला न मानणा-या भाजपाच्या गुंडांविरोधात काँग्रेस लढेल आणि संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजेल असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचा मंत्रालयात ध्वजारोहण समारंभ

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *