Tag Archives: पंतप्रधान

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना तीन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाचा निर्णय

तेहरीक ए-पाकिस्तानचे प्रमुख तथा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोशाखान प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावली. या शिक्षेच्या विरोधात इम्रान खान यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची संधी आहे. इम्रान खान यांचे वकील तातडीने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी पोहोचले. तोशाखान …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची मागणी, …अन्यथा पंतप्रधान मोदींनी शरद पवार आणि राष्ट्रवादीची माफी मागावी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची बदनामी केली

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर सिंचन घोटाळा, सहकारी बँक घोटाळा आणि बेकायदेशीर खाण घोटाळा यासह अनेक घोटाळ्यांचे आरोप केले, त्या आरोपानुसार खटले दाखल करावेत किंवा जाहिरपणे माफी मागावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी …

Read More »

पंतप्रधानांसमोरच शरद पवार म्हणाले, देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लोकमान्य टिळक यांनी एक नवीन इतिहास तयार करण्याचं काम केलं

देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायाच्या काळात लाल महालात झाला. शिवरायांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली. हिंदवी स्वराज्याचा पाया शिवरायानीच रचला. त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. लोकमान्यांनी स्वराजाचे आंदोलन केले. केसरी आणि मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजाना घाम फोडला. टिळक आणि महात्मा गांधींचे योगदान आम्ही विसरु शकत नाही असे राष्ट्रवादी …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा किस्सा सांगत दगडूशेठ हलवाई गणपतीची आठवण डॉ दिपक टिळक यांच्या हस्ते टिळक पुरस्कार सोहळा संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज १ ऑगस्ट पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि टिळक स्मारक समितीच्या डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात लोकमान्य …

Read More »

शरद पवार यांनी मारलेल्या थापेची पुनःरावृत्ती नरेंद्र मोदी यांच्याकडून अजित पवार यांच्यासोबत… पुण्यात टिळक पुरस्कार वितरणानंतर आधी शरद पवार यांनी तर नंतर मोदींनी अजित पवार यांना मारली प्रेमाची थाप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याबद्दल शरद पवार यांनी आनंदही व्यक्त केला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकमान्य टिळक यांची महती सांगणारं एक भाषण केलं. या भाषणानंतर …

Read More »

अतुल लोंढे यांचे स्पष्ट मत,… शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कानउघाडणी करावी मोदी जे काही करत आहेत ते टिळकांच्या विचारसणी विरोधात आहे हे पवारांनी मोदींना सांगावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपस्थित रहावे की नाही हा त्यांचा व त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. परंतु शरद पवार या …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, दिल्लीतील ‘आका’साठी अधिवेशनाला दोन दिवसांची सुट्टी दिली का ? जनतेच्या प्रश्नावर राज्य सरकार आंधळे व बहिरे, विरोधी पक्ष सरकारला जागे करेल

सोमवार व मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आली आहे. सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यामागे सरकारचा काय हेतू आहे हे कळले नाही. असा कोणता भूंकप येणार आहे किंवा अलर्ट जारी झालेला आहे, म्हणून दोन दिवस कामकाज बंद ठेवले आहे याचे ठोस उत्तर मिळत नाही. दिल्लीतून त्यांचे ‘आका’ पुण्यात एका कार्यक्रमासाठी येत आहेत …

Read More »

संसदेत विरोधक पंतप्रधानांची वाट बघतायत, तर पंतप्रधान मुख्यमंत्री गेहलोतांच्या… पीएमओने भाषण हटविल्याने अशोक गेहलोत ऑनलाईन पध्दतीने उपस्थित

एकाबाजूला अडीच महिन्याहून अधिक काळ मणिपूर राज्यातील हिंसाचार काही केल्या थांबायला तयार नाही. त्यातच दिवसेंदिवस तेथील नवनवीन घटनांचे धक्कादायक व्हिडिओ बाहेर येत आहेत. यापार्श्वभूमीवर सध्या संसदेच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरप्रश्नी आपले मत मांडावे यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांकडून रोज गोंधळ घातला जात आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत जायलाही …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचे टीकास्त्र, पंतप्रधान मोदी INDIA ला ईस्ट इंडिया कंपनी म्हणतायत… मात्र मणिपूरप्रश्नी पंतप्रधान आजही संसदेत बोलायला तयार नाहीत

जवळपास अडीच महिन्यापासून ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात उफाळलेल्या हिंसाचार काही केल्या शमायला तयार नाही. उलट दिवसेंदिवस मणिपूरमधील हिंसाचाराच्या नवनवीन घटनांचे व्हिडिओ आणि माहिती बाहेर येत आहे. त्यातच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या दिवसापासून काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मणिपूरप्रश्नी चर्चेची मागणी केली. मात्र काल गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ …

Read More »

मणिपूरमधील भाजपा आमदाराकडूनच पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह न्युजलाँड्री या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केला अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट

साधारणतः दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूर मधील हिंचासार काही केल्या शांत होण्याची चिन्हे दिसून येत आहे. अखेर मणिपूरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दट्ट्या दिल्यांनंतर व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा शासित मणिपूरबरोबर काँग्रेसची राजवट असलेल्या राज्यांना लक्ष्य करत विरोधकांवरच टीका केली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर …

Read More »