पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील दापचरी येथे ५५८.४३ हेक्टर (१,३९५ एकर) क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार असून, हा प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरेल, असा विश्वास पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधताना दापचरी येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय …
Read More »जयकुमार रावल यांची घोषणा, विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार विना परवाना माल खरेदी-विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त
राज्यात शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे संरक्षण आणि कृषी उत्पन्न बाजार व्यवस्थेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ अंतर्गत राज्यातील शेतमाल खरेदी-विक्री व्यवहाराचे नियमन करण्यात येते. मात्र राज्यातील काही भागांत अनेक व्यापारी, संस्था तसेच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी-विक्री करत …
Read More »जयकुमार रावल यांचा इशारा, फळे व भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई होणार फळे, भाजीपाला व इतर शेतमाल भेसळखोर ‘पणन’ च्या रडारवर
राज्यातील शेतकरी दर्जेदार फळे, भाजीपाला तसेच इतर शेतमालाचे उत्पादन करतात. मात्र, काही ठिकाणी फळांची गोडी वाढविण्यासाठी, कृत्रिमरित्या पिकविण्यासाठी किंवा अधिक आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. अशा प्रकारे भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. यासंदर्भात …
Read More »जयकुमार रावल यांची माहिती. तूर व हरभरा खरेदीला मुदतवाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा हरभरा खरेदी उद्दिष्टातही ५८६३२ मेट्रिक टनाची वाढ
राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून केंद्र शासनाने खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच हरभरा खरेदीत आणखी ५८ हजार ६३२ मेट्रिक टन वाढ केली असून आता राज्यात ८ लाख १९ हजार ८८२ मेट्रिक टन हरभरा खरेदी करता येणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. …
Read More »जयकुमार रावल यांचे आश्वासन, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा, सोबतच सामान्य ग्राहकांचे हितही जपले जावे, यासाठी कांद्यावर प्रक्रिया उद्योगास चालना देण्यावर भर देण्यास शासन कटीबद्ध असल्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मंत्री रावल यांनी कांदा प्रक्रिया व साठवणुकीच्या उपाययोजनांवर …
Read More »जयकुमार रावल म्हणाले, शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा वाढवणजवळ उभारणार जगातील सर्वोत्तम बाजार व्यवस्था
बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचबरोबर शेतीमालाच्या उत्पादनासोबतच त्याचे मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि विक्री या सर्व बाबींमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी …
Read More »फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद
मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने मर्यादित असला तरी व्यापार, उद्योग, सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मनिला येथे केले. मंत्री जयकुमार रावल यांनी मनिला येथे आयोजित विशेष कार्यक्रमात …
Read More »जयकुमार रावल यांची माहिती, राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता केंद्राने मंजूरी दिल्याची माहिती
महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत पणन मंत्री जयकुमार रावल यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा …
Read More »किमान आधारभूत किमतीने सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू ऑनलाइन ॲपद्वारे व खरेदी केंद्रावर नोंदणी राज्यस्तरीय तीन नोडल संस्थांची नियुक्ती
सोयाबीन, मूग आणि उडीद या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. या खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून सुरू होत असून कापूस खरेदीसाठी ‘कपास किसान’ अॅपद्वारे नोंदणी १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू आहे. शेतकऱ्यांनी ॲपद्वारे अथवा खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. एमएसपीनुसार पूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल ,” …
Read More »शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी
शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक तातडीने बोलावण्याची मागणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली. तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक हित आणि कृषी …
Read More »
Marathi e-Batmya