पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ …
Read More »पुण्यात इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यात पूल कोसळला, दोघांचा मृत्यू काही लोक वाहून गेले, मृत्यू पावलेल्यांना पाच लाखांची मदत
मागील काही दिवसांपासून पुण्यात सुरु असलेली पावसाची संततधार आजही कायम रविवारीही कायम होती. रविवारच्या या दुपारच्या मुसळधार पावसात पुण्यातील इंद्रायणी नदीवरील जुना पूल अर्थात कुंडमळ्यात पूल कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आणि ३२ जण जखमी झाले, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पूल कोसळून इंद्रायणी नदीत पडला आणि …
Read More »पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा ओमीक्रॉनचे जेएन, एक्सएफजी व जीएफ ७-९ हे उपप्रकार आढळले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत पुणे विभागातील कोविड-19 साथीच्या अनुषंगाने आढावा घेतला. लक्षणे सौम्य असली तरी वृद्ध तसेच सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून आरोग्य विभाग, महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. …
Read More »पुण्यात अजित पवार यांची ताकद मोठी की शरद पवार यांची शक्ती प्रदर्शनात दिसणार वर्धापन दिन मेळाव्यांतून दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या पुण्यात शक्तीप्रदर्शन
राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून यंदा आपला २६ वा वर्धापन दिन पुण्यात साजरा केला जाणार आहे. या वर्धापन दिन कार्यक्रमाची दोन्ही राष्ट्रवादींकडून स्वतंत्रपणे तयारी करण्यात आली आहे. आगामी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात होत असलेल्या या वर्धापन दिनास विशेष महत्व आले आहे. …
Read More »अजित पवार यांच्याकडून बारामती, इंदापूर, पुणेसह अन्य जिल्ह्यांतील परिस्थितीचा घेतला आढावा मान्सूनच्या मुसळधार पाऊसाची अनेक जिल्ह्यात हजेरी
मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन 'पुणे अर्बन डायलॉग आव्हाने आणि उपाय' कार्यक्रमाचे
आज महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो. यासाठी ‘पुणे अर्बन डायलॉग’ सारखे मंथन आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशदा, बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट, इंटरनॅशनल सेंटर आणि पुणे …
Read More »महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या कामावरून छगन भुजबळ यांची नाराजी महिन्याभरात स्मारकाचे काम मार्गी लावण्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे आश्वासन
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारक व भिडे वाडा स्मारकाच्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले क्रांतीज्योती व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी ॲड. मंगेश ससाणे, ॲड मृणाल ढोले पाटील, …
Read More »नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणांना हद्दीतील शासकीय जमिनी मिळणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यातील नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणांच्या नावावर वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयानुसार, महानगर प्रदेशातील सर्व भारमुक्त शासकीय जमिनी राज्य शासनाच्या अटी व शर्तींनुसार प्राधिकरणांना हस्तांतरित करण्यात येणार आहेत. संबंधित प्राधिकरण …
Read More »दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आंदोलनावरून भाजपामध्ये ठिणगी खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपाच्या शहराध्यक्षामध्ये सुरु झाला वाद
पुण्यातील प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेला प्राण गमवावे लागले ही घटना समोर आल्यानंतर विविध पक्ष संघटनांनी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलने केली. भाजपाच्या महिला मोर्चाने देखील रुग्णालयाच्या विरोधात आक्रमक आंदोलन करताना एका क्लिनिकची तोडफोड केली. या प्रकारामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांनी या आंदोलनाबाबत तीव्र …
Read More »दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल चौकशीसाठी समिती गठित, धर्मादाय रुग्ण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या धर्मादाय रुग्ण योजनेची धर्मादाय रुग्णालयांकडून अंमलबजावणी होत नसल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, …
Read More »
Marathi e-Batmya