Tag Archives: श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर पंढरपूर

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश, पंढरपूर येथे गोशाळा विस्तारासह पिकनिक स्पॉट उभारणीचा प्रस्ताव सादर करा सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे दिले निर्देश

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या अखत्यारित पंढरपूर नगरपालिका हद्दीतील यमाई तलाव परिसरात गोशाळा कार्यरत आहे. या गोशाळेच्या विस्तारासह त्या ठिकाणी पिकनिक स्पॉट विकसित करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिले. मंदिर समितीने गोशाळेला लागून असलेली अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची पांडुरंगाला प्रार्थना, बेरोजगारांना रोजगार मिळो आणि महिला…. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सहकाऱ्यांसह पालखी सोहळ्यात सहभाग

राज्यातील बळीराजा आज हवालदिल झालेला आहे, अवकाळी पावसाने शेतातील उभं पिक वाया गेलं, शेतमालाला भाव मिळत नाही, त्याचे जगणेच कठीण झाले आहे. शेतकऱ्याला चांगले दिवस येवो, बेरोजगारांना रोजगार मिळो, महिलांवरील अत्याचार कमी होवो आणि आता विश्वात्मके देवे, ही संकल्पना साकार करण्याच्या अनुषंगाने दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात, अशी प्रार्थना पांडुरंग चरणी …

Read More »

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी टोलमाफी जाहिर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासन निर्णय जारी

राज्याचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठू-रूकमाईच्या भेटीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी मोठ्या प्रमाणावर पंढरपूरला जातात. त्यामुळे पंढरपूरला वारीसाठी जाणाऱ्या वारकरी दिंड्या, त्यांच्यासोबत असलेली वाहने यांना पथकरातून अर्थात टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ३ जुलै ते २१ जुलै या कालावधीकरीता ही टोलमाफी देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय राज्य …

Read More »

अजित पवार यांचे आदेश, पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा द्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दिले आदेश

आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, असेही सांगितले. विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२४ …

Read More »