भिक्षेकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगर येथे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित ‘वसुधा’ हा प्रकल्प सुरू आहे, या प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात अन्यत्र प्रकल्प उभारण्याबाबत कार्यवाही व्हावी यासाठी विभागाने पाहणी करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयात महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती पंतप्रधान मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना
केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ …
Read More »दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती
दिवेआगार ता.श्रीवर्धन, जि. रायगड येथील सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता देऊन यासाठी ५ कोटी ६४ लाख ३१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. मंत्रालयात आज दिवेआगार ता.श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्र, गिरणे, ता.तळा येथे खार भूमी संशोधन केंद्र आणि किल्ला, ता.रोहा येथील काढणी …
Read More »केंद्र व राज्य शासनाच्या महिलांकरिता असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान माध्यमातून महिलांच्या योजना प्रभावीपणे राबवणार
महिलांना संघटीत करणे, प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलासंदर्भातील शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी करणे, सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी एकत्र येऊन योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देणे या उद्देशाने सर्व जिल्ह्यांमध्ये २ ऑक्टोबर, २०२३ ते १ ऑक्टोबर, २०२४ या कालावधीत राज्यामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री …
Read More »महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील लोरियल इंडिया व माविम यांच्यात सामंजस्य करार
लोरियल इंडिया व महिला व आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यातील सामंजस्य करारामुळे महिलांची आर्थिक उन्नती होणार असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांना प्रदेशनिहाय शेतीमधील विविधता लक्षात घेऊन विविध स्टेक होल्डर व ‘माविम’ यांच्या समन्वयाने प्रशिक्षण देणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. कफ परेड येथील हॉटेल प्रेसिडेंट …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील ५८ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रिक्त पदे भरण्याला प्राधान्य
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच चौथ्या महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले असून त्यांची झालेली नियुक्ती म्हणजे एक सेवेची संधी आहे. या कामाच्या माध्यमातून राज्यातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य सुधारणेच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »भिक्षेकरी यांनाही मिळणार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
चेंबूर येथील शासकीय पुरुष आणि महिला भिक्षेकरीगृह आणि मानखुर्द येथील दि चिल्ड्रेन्स एड होम, मुले तसेच मुलींचे नवीन बालगृह , गतिमंद मुलांसाठीचे बालगृह, चिल्ड्रेन्स एड सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अलीकडेच भेट देऊन तिथे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, अन्न-धान्याची गुणवत्ता, स्वयंपाकाच्या ठिकाणी …
Read More »महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेसमवेत सामंजस्य करार करणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
राज्यातील महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत लवकरच एक कृती आराखडा तयार करून सामंजस्य करार करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्रालयात संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला परिषदेच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास …
Read More »राज्यात पाळणाघर योजनेबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन
पाळणाघर योजनेबाबत राज्य शासनाची नियमावली तयार करण्यासाठी तसेच ही योजना राबविताना शासकीय, अशासकीय संस्थांचेही मत विचारात घेण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण, कामगार, गृह आणि महिला व बालविकास विभागाची संयुक्त बैठक घेणार असून चौथ्या महिला धोरणात पाळणाघराबाबत निर्णयाचा समावेश करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. …
Read More »बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश
बालगृहांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी एका महिन्यात बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. बालकांना देण्यात येणाऱ्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. राज्यातील बालगृहे, विशेष गृहे, खुले निवारा गृह, बालकांसाठी सुरक्षित ठिकाण, अनुरक्षणगृहे याबाबत आज मंत्रालयात आढावा बैठकीचे …
Read More »
Marathi e-Batmya