राज्यात राजकीय उलथापालथ झाली असून अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड पुकारले आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादीतही दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट राष्ट्रवादीत पडले असून पवारांनी आता बंडखोर आमदारांविरोधात बडगा उगारला आहे. अजित पवारांसह नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी …
Read More »अजित पवार गटांकडून जंयत पाटील कार्यमुक्तः पाटील, आव्हाड यांच्या अपात्रतेसंद्रर्भात तक्रार शरद पवार यांनी केली प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची हकालपट्टी
रविवारी २ जुलै रोजी अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी पक्षाची परवानगी न घेता राजभवनावर जाऊन थेट उपमुख्यमंत्री पदाची आणि मंत्री पदाची शपथ घेतली. तसेच या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार सुनिल तटकरे आणि नव्याने कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आलेले प्रफुल पटेल हे ही पक्षाची परवानगी न घेता हजर राहिले. त्यामुळे …
Read More »नितेश राणे यांची टीका, राष्ट्रवादीच सामील झाल्याने ‘मविआ’ नामशेष संजय राऊत यांचे आता काँग्रेस लक्ष्य
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शिवसेना – भाजपा सोबत सरकारमध्ये सामील झाल्याने आता महाविकास आघाडी पूर्णपणे नामशेष झाली आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रदेश प्रवक्ते अभिषेक मिश्रा,ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. अजित पवार …
Read More »अजित पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आता कोणाची विकेट पडली.. शरद पवार यांचे नाव न घेता केला पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या इतर नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवारांसह छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ अशा बड्या नेत्यांचा …
Read More »जयंत पाटील यांचा सवाल, शपथविधीला बोलावून अजित पवारांनी कशावर सह्या घेतल्या… महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने या सगळ्या घटनेत शरद पवारसाहेब यांच्याबरोबर राहणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार काम करत होते. आज सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे विधानसभा सदस्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी राजभवनावर जाऊन शपथ घेतल्याचे निदर्शनास आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्याकडून देखील पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या सगळ्या घटनेत …
Read More »जितेंद्र आव्हाड म्हणाले, थांबा जरा, टेलिफोन ऑपरेटरने फोन लावायला सुरुवात… विरोधी पक्षनेते पद आणि पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी निवड झाल्यानंतर दिला सूचक इशारा
अजित पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिकामी झाले होते. अजित पवारांनी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने हे पद कोणाकडे जाणार असाही प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, अजित पवारांच्या बंडखोरीच्या अवघ्या दोन तासाच्या आतच शरद पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवली आहे. तसंच, विधिमंडळाच्या …
Read More »नाना पटोले यांचा खोचक टोला, एकनाथ शिंदेंचे हिंदुत्व आता राष्ट्रवादीच्या फुटीर गटासोबत…. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण, सत्तापिपासु भाजपाकडून पुन्हा तोडफोडीचे महाभारत
महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु असून …
Read More »अजित पवार यांच्या आडून भाजपाने केला मुख्यमंत्री शिंदेचा ‘गेम’? शिंदे गटातील संभावित मंत्र्यांचा शपथविधी पुन्हा लटकणार
राज्यात एकेकाळचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेत बंड घडवून आणत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना वेगळे करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार भाजपाने स्थापन केले. या सरकार स्थापनेलाही एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी शिंदे गटाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना अद्यापही जनतेतून सहानभूती आणि पाठिंबा मिळविता आला …
Read More »अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार म्हणाले, सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो… ज्या आरोपांचा उल्लेख केला आणि ते आरोप ज्यांच्याशी संबधित होते त्यांना सहभागी करून सुटका केली
नुकतेच मध्य प्रदेशातील भोपाळ येथील भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाव घेत टीका केली होती. त्यानंतर आज शरद पवार यांचे पुतणे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १० ते १२ आमदारांना सोबत घेत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री …
Read More »उपमुख्यमत्री पदाच्या शपथविधीनंतर अजित पवार म्हणाले, मागील ९ वर्षे पंतप्रधान मोदी यांच्या…. उपमुख्यमत्री पदाच्या शपथविधीनंतर अजित पवार म्हणाले, आम्ही पक्ष चिन्हासह राष्ट्रवादी म्हणून सरकारमध्ये...
राज्यात पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी होत असतानाच आणि त्या शपथविधी मागे नेमकं कोण या बाबतची उस्तुकता अद्याप राजकिय वर्तुळात असतानाच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप घडवून आणला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर …
Read More »
Marathi e-Batmya