Tag Archives: ajit pawar

सुनेत्रा पवार यांचे आश्वासन,पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी अजितदादांनी पाहिलेले पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे

पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी अजितदादांनी दिलेला वेळ, घेतलेले कष्ट आणि दाखवलेली निष्ठा यांची जाणीव प्रत्येकाला आहे. या शहराला सुंदर, नियोजनबद्ध आणि विकसित शहर बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. शहर घडवताना त्यांनी अनेक माणसेही घडवली. पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. शहराच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी शासन खंबीरपणे पाठीशी असून शहरातील सुरू असलेली …

Read More »

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं घोडं अडलं, राजकीय युतीचा मुद्दा आल्याने रखडलं सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार विलनीकरणाबाबत फारसे उत्सुक नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) दोन गटांना पुन्हा एकत्र आणण्याच्या प्रयत्नांत अडथळे निर्माण झाले आहेत. नेतृत्व, संघटनात्मक नियंत्रण आणि भविष्यातील राजकीय युती यांसारख्या मुद्द्यांवरील मतभेदांमुळे या प्रस्तावित विलीनीकरणाची प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवार यांच्याशी पुन्हा संपर्क साधला असला, तरी सुनेत्रा पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार हे तातडीने …

Read More »

सुनेत्रा पवार यांची स्पष्टोक्ती, सोमेश्वर कुणा एकाची खासगी मालमत्ता नाही; हा शेतकऱ्यांच्या विश्वासाचा कारखाना जेथे दादा होते, तेथे वहिनीव असेल; शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभी राहिन...

दादांची जबाबदारी आता मी घेतली असून शेतकरी आणि कारखान्याच्या प्रत्येक अडचणीसाठी मी खंबीरपणे उभी आहे. कोणतीही अडचण आली तरी दादांप्रमाणेच प्रत्येक बाबतीत आपल्या पाठीशी उभी राहिन असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिला. सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, अजितदादांनी दिलेल्या दिशेनेच आपण पुढे जायला …

Read More »

सुनेत्रा अजित पवार यांची भावना, अजितदादांच्या जाण्याचं दुःख किती हे माझी मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार अजितदादांच्या अपघाताचे राजकारण कुणी करु नका

अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात जी पोकळी निर्माण झाली आहे ती किती आहे हे माझी मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार त्यामुळे अजितदादांच्या अपघाताचे राजकारण करु नका अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांना सुनावले आहे. दादांच्या अपघातानंतर काहीतरी ठोस निर्णय आला …

Read More »

सुनिल तटकरे यांचा विश्वास, दादांच्या स्वप्नातील पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम आमचे सर्वांचे सुनेत्रा वहिनी आमच्या पक्षाच्या अध्यक्षा

दादांच्या स्वप्नातील पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम आमचे सर्वांचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, दादांनी ज्या कठोर परिश्रमातून एनडीएसोबत जाण्याची क्षमता प्रखरतेने दाखवली होती…आत्मविश्वासाने दाखवली होती. मात्र लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत पुन्हा …

Read More »

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास मान्यता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय

“महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली” असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी …

Read More »

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एएआयबी चा प्राथमिक अहवाल जाहिर विमान पहिल्यांदा झाडावर आदळले आणि कमी दृश्यमानतेमध्ये लॅडींगचा प्रयत्न

शनिवारी, नागरी उड्डाण मंत्रालयाची चौकशी करणारी शाखा असलेल्या विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित विमान अपघाताबाबत २२ पानांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. अहवालात कमी दृश्यमानता, VFR (व्हिज्युअल फ्लाइट रूल्स) चे संभाव्य उल्लंघन आणि बारामतीच्या अनियंत्रित विमानतळावरील सुरक्षा त्रुटी आणि विमान पहिल्यांदा झाडावर आदळल्याची माहिती …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची भावुक, ‘मित्रशोक हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो’ शोकप्रस्तावा दरम्यान व्यक्त केली भावना

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. महाकवी भास यांच्या ‘स्वप्नवासवदत्तम्’ या नाटकातील सुभाषिताचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो; पण मित्रशोक हृदय आणि …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे भावूक उद्घगार, अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. दादा, राजकारणात आपण घेतलेले अनेक निर्णय अचूक होते हे जनतेच्या न्यायालयाने सिद्ध केले आहे, पण तुमचा हा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय मात्र चुकला आहे. तो मागे घ्या आणि परत या, अशा भावूक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

उद्धव ठाकरे यांची भावना, अजित दादा सारखा उत्तम, दिलदार मित्र गमावला अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. मात्र आजही अजित पवार गेले याचे वास्तव अद्यापही वाटत नाही. परंतु निसर्ग नियमानुसार अजित पवार यांच्या मृत्यू झाला हे कटू सत्य स्विकारण्याशिवाय पर्याय नाही. आज पासून अर्थसंकल्पिय अधिवेशऩाला सुरूवात झाली. प्रथे प्रमाणे विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेत अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक …

Read More »