Tag Archives: chief minister

महेश तपासेंचा आरोप, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प जाण्याचा सपाटा…

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन सर्वाधिक गुंतवणूकीचा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला. त्यापाठोपाठ राज्यात येवू घातलेला बल्क ड्रग्ज् पार्क आणि तिसरा टाटाचा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला. या तिन्ही प्रकल्पावरून राज्यात राजकिय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. या प्रकल्प बाहेर पडण्याच्या यादीत आता आणखी एका प्रकल्पाची समावेश झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते …

Read More »

भाजपा म्हणते, शिंदे-फडणवीसांच्या राज्यात दादागिरी सहन करणार नाही

एखाद्या चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप असेल तर त्याच्या विरोधात तक्रार करता येईल किंवा शांततामय पद्धतीने विरोधही करता येईल. पण चित्रपटगृहात जाऊन मारहाण करण्याची दादागिरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात कोणीही सहन करणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिला. बावनकुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात …

Read More »

गजानन किर्तीकरांनी ठाकरेंची मशाल सोडत हाती धरली शिंदेंची ढाल तलवार

मागील अनेक दिवसांपासून उध्दव ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसेच या अनुषंगाने शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही किर्तीकर हे उध्दव ठाकरे गट सोडणार असल्याचे भाकित वर्तविले होते. त्यानुसार आज गजानन किर्तीकर यांनी उध्दव ठाकरे गटाची साथ सोडत …

Read More »

मुंबई-पुण्याला जोडणारी मिसींग लिंक २०२३ मध्ये पूर्ण होणार

जगभरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गातील ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ देशातील पथदर्शी प्रकल्प ठरणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर २०२३ हा प्रकल्प पूर्णत्वास येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनों योजनांचा लाभ घ्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास शैक्षणिक, उद्योग कर्ज योजनांसाठी केंद्राकडून निधी

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज तर उद्योग- व्यवसायासाठी मुदत कर्ज आणि सूक्ष्म पतपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून निधी कर्ज स्वरुपात उपलब्ध झाला असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी महामंडळाकडे अर्ज करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. अल्पसंख्याक विभागाच्या शैक्षणिक कर्ज, मुदत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सरकार बदलले आता मुंबई ही बदलणार

मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून महाराष्ट्राला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आम्ही ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात  केली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यावर भर आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. इकॉनॉमिक टाईम्सच्या आर्किटेक्चर,कन्स्ट्रकशन, इंजिनिअरिंग या गोरेगाव येथील एसटेक प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते …

Read More »

जागतिक दिव्यांग दिनी राज्यातील दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय

राज्यातील साडेतीन कोटी दिव्यांगांसाठी राज्य सरकारने आज महत्वाचा निर्णय घेतला आहे दोव्यंगांचे मूलभूत प्रश्न आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी “दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय” स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन बांधण्यात येणार असून नोकरीतदेखील ५ टक्के वाटा देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.येत्या ३ डिसेंबर …

Read More »

ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्रात सामंजस्य करार करणार इलेक्ट्रिक वाहन, पर्यटन प्रकल्पांच्या निर्मितीसाठी परस्परांना सहकार्य

ब्रिटनमधील वेस्टमिडलँड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये गुंतवणूकविषयक सामंजस्य करार करण्यात येणार आहे. वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी शिष्टमंडळासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी परस्पर सहकार्याने दोन राज्यातील संबंध अधिक दृढ  करण्याचा निर्णय घेतला. मुंबई-बर्मिंगहम विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे …

Read More »

आशियाई बँकेने सांगितले मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पांना अर्थसहाय्य सुरु

सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी समुह विकास प्रकल्पांसोबतच राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, पर्यावरण स्नेही नवीन महाबळेश्वर प्रकल्प, पर्यटनाला चालना देणारा मुंबई-सिंधुदूर्ग सागरी महामार्ग प्रकल्प तसेच नदीजोड प्रकल्प, नाशिक, ठाणे आणि पुणे मेट्रो प्रकल्पांना आशियाई विकास बँक (एशियन डेव्हलपमेंट बँक) च्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आशियाई …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सत्तार यांच्या घरावर निदर्शने

औरंगाबाद येथे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अश्लिल शिवी देत आक्षेपार्ह विधान केले. शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात खोक्यावरून सुळे यांनी डिवचल्याबाबत प्रसार माध्यमांनी विचारले असता अब्दुल सत्तार यांनी शिवी देत विधान केले. सत्तार यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या …

Read More »