पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवारी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. भाजपा-शिंदे गटाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहन रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर सभेत बोलताना विरोधी …
Read More »केंद्रीय मत्स्य मंत्री रूपाला यांची घोषणा, मच्छिमारांसाठी एनडीआरएफचे निकष बदलणार मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्रातले मच्छिमार बांधव हे दररोज उत्तुंग लाटांशी सामना करुन आपला जीव धोक्यात घालून आपला मच्छिमारीचा व्यवसाय करतात. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात हरित आणि पर्यावरणपूरक उद्योगाबरोबरच मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ससून डॉक येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. गेल्या काही काळात एनडीआरएफ मार्फत मच्छिमारांचे नुकसान …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात दीड वर्षांत सुरू होणार रो-रो सेवेचे चार प्रकल्प महाराष्ट्रातील बंदर, नौकानयन, सागरमाला प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत
केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदर, नौकानयन, सागरमाला या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस केंद्रीय जहाज व परिवहन सचिव सुधांश पंत, मुंबई …
Read More »नाना पटोलेंचा सवाल, विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व खा. संजय राऊत प्रकरणी चौकशी करून दोषींना अद्दल घडवा
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात असून त्यांचा घातपात करण्याचा डाव समोर आला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मारण्याची सुपारी देण्यात आल्याचे समजते. असे प्रकार राज्यात वाढत असून विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, राज्यात २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करणार सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा कणेरी मठ येथे शुभारंभ
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी केले. कणेरी मठ येथे २० ते …
Read More »ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकारः मात्र नियमित याचिकेसोबत यावरही सुनावणी घ्या
निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत सर्वचस्तरातून संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आज सकाळी याचिका दाखल करत या प्रकरणी तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने तातडीने सुनावणी घेता येत नसल्याचा निर्णय दिला. …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादानेच आपल्याला शिवसेना हे नाव मिळाले
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री …
Read More »रमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात घेतली शपथ
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापुरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. बैस हे २० वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या समारंभास राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले “मॅग्नेटिक महाराष्ट्र” ऑक्टोंबरमध्ये मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्टिनेशन’
केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने काम करीत आहे. राज्य शासन उद्योग वाढीसाठी योग्य आणि सकारात्मक निर्णय घेत आहे. उद्योजकांना विश्वास प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढायला सुरूवात झाली आहे. परदेशातील गुंतवणूक आणण्यासाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्टिनेशन’ झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच येत्या ऑक्टोंबरमध्ये “मॅग्नेटिक महाराष्ट्र” …
Read More »एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर अखेर शिंदे-फडणवीस सरकारकडून वेतनासाठी पैसे महाविकास आघाडीच्या काळातील भाजपाचे नेते मात्र गायब
मागील चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे थकित पगारीमुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पुन्हा एकदा संपाचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला. त्यानंतर परभणीतील एका एसटी कर्मचाऱ्यांने पगार न मिळाल्याने भेडसावत असलेल्या आर्थिक तंगीमुळे अखेर काल आत्महत्या केली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने अखेर २५० कोटी रूपये एसटी …
Read More »
Marathi e-Batmya