मुंबई : प्रतिनिधी इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. …
Read More »कंपनी, दुकान मालकांनो कर्मचाऱ्यांचे पगार कापाल तर तुरूंगात जाल राज्य सरकारकडून आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे. याकालावधीत अनेक कामगारांना घरीच थांबावे लागत आहे. त्यामुळे या कालावधीतील कंपन्यांमध्ये असलेले कंत्राटी कर्मचारी, विस्थापित-बेघर कर्मचारी, आऊटसोर्सिंग करण्यात आलेल्या कर्मचाऱी आणि खाजगी दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कापल्यास संबधित मालक, कंपनीच्या प्रमुखावर कायदेशीर कारवाई करून एक ते दोन वर्षाची …
Read More »शेतकऱ्यांसाठी खुषखबर: दररोज १० लाख लिटर दूधाची खरेदी २५ रुपये दराने करणार असल्याची उपमुख्यमंत्री पवार यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करेल. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरु होईल आणि ‘कोरोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात …
Read More »राज्य सरकारच्या आवाहनाला भाजपाचा प्रतिसाद भाजपातर्फे सेवाकार्य अभियानातंर्गत १ लाख २५ हजार कार्यकर्त्ये कामाला
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यावर आलेल्या कोरोना आजार संकटाच्या मुकाबल्यासाठी सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षांनी एकजूट दाखवित एकत्र येण्याचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. या आवाहनाला प्रदेश भाजपाने सकारात्मक प्रतिसाद असून राज्यातील गरजू लोकांना जेवण, त्यांना दैनंदिन वस्तुंचा पुरवठा, रक्तदान शिबीरे आदी गोष्टींसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला …
Read More »मुख्यमंत्र्यांसह आमदार ते सरपंचापर्यंतच्या सर्वांना फक्त ४० टक्के वेतन तर सरकारी कर्मचाऱ्यांचे २५ ते ५० टक्के वेतन कपात करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी ‘कोरोना’ लॉकडाऊनची लक्षणे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दिसण्यास सुरुवात झाली असून याचा परिणाम म्हणून मुंख्यमंत्र्यांसह, आमदार, मंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्यापासून ते सरपंचापर्यंत मिळणाऱ्या वेतनात ६० टक्के तर राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ ते ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. …
Read More »खुषखबर : राज्यातील घरगुती आणि उद्योगासाठीची वीज स्वस्त घरगुती वीज ५ ते ७ आणि उद्योग १० ते १२ टक्क्याने स्वस्त -राज्य नियामक आयोगाची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी कोरोना रोगाचा प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस आर्थिक परिस्थिती हाताबाहेर चालल्याने विद्यमान परिस्थीती आणि भविष्यकाळाच्या दृष्टीकोनातून राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य नियामक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षासाठी घरगुती वीज दरात ५ ते ७ टक्के आणि उद्योगासाठीच्या वीज दरात १० ते १२ टक्के वीज दर कपात केल्याची माहिती …
Read More »कोरोना लॉकडाऊनमध्ये मुंबईतल्या १० लाख झोपडीधारकांसाठी हवेचे इमले पहिल्याच आठवड्यात बंगल्यातील बैठकीत मंत्र्यांनी घेतला निर्णय
मुंबई: विशेष प्रतिनिधी मुंबईसह राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढू नये यासाठी राज्य सरकारने १५ मार्चपासून लॉकडाऊन करण्याची तयारी सुरु केली. तसेच यासंदर्भात १९ मार्चला अधिकृत आदेशही जारी केले. मात्र विकासकांचे कैवारी म्हणून वावरत असलेल्या एका मंत्र्याने मुंबईतील झोपडपट्टीवासियांसाठी फक्त हवेतल्या इमल्यांची तर विकासकांना दिर्घकालीन मलिद्याची व्यवस्था करणारा निर्णय २० मार्च …
Read More »पवार म्हणाले, आपल्याला अमेरिका, स्पेनच्या वाटेवर जायचे नाही समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना आवाहन
मुंबई: प्रतिनिधी पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिका, स्पेन या देशांची सध्या भयावह उदाहरणे आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही. आपल्याला मिळालेल्या सूचनांचे पालन करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने काटकसर करावी लागणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची …
Read More »चला आर्थिक हातभार लावू या कोरोना विरोधी लढ्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19, पीएम केअरस् खात्यात जमा करू या निधी
मुंबई : प्रतिनिधी कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत. केवळ याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा …
Read More »राज्याचे मुख्य सचिव मेहतांना तीन महिन्यांची मुदतवाढ मुदतवाढीस केंद्राची मान्यता
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या संकटाने सगळ्यांना ग्रासलेले असल्याने आहे. तसेच या संकटाचा सामना करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे प्रशासन काम करत आहे. या आपातकालीन परिस्थितीमुळे त्यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असल्याने आता मेहता हे ३० जून २०२० रोजी निवृत्त होतील. मुख्य सचिव …
Read More »
Marathi e-Batmya