Tag Archives: cultural minister

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आशिष शेलार यांचा परदेश दौरा केला रद्द सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांचा कान्स दौरा रद्द

  देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी यंदाच्या फ्रान्स येथील कान्स फिल्म फेस्टिव्हलला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, चित्रपट उद्योगासाठी प्रोत्साहन धोरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती राज्यात नवीन फिल्म सिटी, सिंगल विंडो क्लिअरन्स आणि आधुनिक चित्रीकरण सुविधांवर भर

राज्यातील चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी तीन तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. या समितीने देशातील विविध राज्ये तसेच परदेशातील चित्रपट उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या सवलती, अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून …

Read More »

आशिष शेलार यांचे आवाहन, वृद्ध कलावंतांची आधार पडताळणी तात्काळ करा वृद्ध कलांवतांचे मानधनही तात्काळ द्या

राज्यातील वृद्ध कलावंतांना मानधन मिळण्यासाठी आवश्यक असलेली आधार पडताळणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून वृद्ध कलावंतांचे मानधन तत्काळ देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य आणि इलेक्ट्रानिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, येथे झालेल्या आढावा बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यांतील ‘आपले …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपटास मान्यता प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची दिली माहिती

कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी परिसरातील सुमारे …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित किल्ल्यांच्या जतनासाठी स्वतंत्र किल्ले संवर्धन प्राधिकरण स्थापन करणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली. विधानसभा नियम २९३ अन्वये सांस्कृतिक कार्य विभागासंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, “मराठा …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार १६४ मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण केलेल्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील ६५ चित्रपट आणि कोविड काळातील ९८ चित्रपटांना एकूण २४ कोटी १० लाख अर्थसहाय्य मंगळवारी वितरित करण्यात आले. त्यावेळी मुंबईत केवळ मराठीसाठी स्वतंत्र चित्रनाट्यगृह लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र शासनाकडून निधी मंजुर

सिंधुदुर्गातील सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठअंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून ५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिली. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यास, संशोधन आणि दस्तावेजीकरणाला नवी दिशा मिळणार असून हे अध्यासन मालवण येथे …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, ३६५ दिवसात १२०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम आशा भोसले व सुधीर फडके यांच्या बहारदार गीतांची "दीप उत्सव दिवाळी पहाट"

राज्यभर ३६५ दिवसांत १२०० पेक्षा अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जनमानसात पोहोचविण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले. आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, लोकनाट्य व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याचा प्रस्ताव समितीपुढे सांस्कृतिक विभागानंतर मंत्री शेलार यांची माहिती

लोकनाट्य/ तमाशा हे नाव संगीतबारी कला केंद्रासाठी न वापरण्याचे बंधन असावे, या तमाशा कलावंत संघटनेच्या मागणीचा प्रस्ताव यापूर्वी स्थापित झालेल्या समितीकडे पाठविण्यात यावा. या समितीने कलाकेंद्र व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याबाबतचा निर्णय पुढील १५ दिवसात द्यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले. तमाशा कलावंताच्या विविध प्रश्नासंदर्भात आज पु. …

Read More »

राज्य नाट्य स्पर्धेतील पारितोषिक रकमा, नाट्यनिर्मिती खर्च आणि दैनिक भत्त्यात दुपटीने वाढ सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना नाटक सादर केल्यानंतर नाट्यनिर्मितीसाठी जो खर्च देण्यात येतो, तसेच नाट्यसंस्थेस मूळ ठिकाणाहून दुसऱ्या केंद्रावर नाटक सादर केल्यास त्या कलाकारांना दैनिक भत्ता देण्यात येतो. या सर्व रकमांमध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घेतला असून याबाबतचा …

Read More »