पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आशिष शेलार यांचा परदेश दौरा केला रद्द सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांचा कान्स दौरा रद्द

 

देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी यंदाच्या फ्रान्स येथील कान्स फिल्म फेस्टिव्हलला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी सांगितले की, कठीण काळात देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत विभागीय खर्चांमध्ये संयम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अधिकाधिक बैठका व्हर्च्युअल माध्यमातून घेण्यात येणार असून संसाधनांचा मर्यादित वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषे शेलार म्हणाले की, कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या मराठी चित्रपट तसेच त्यासंदर्भातील आवश्यक समन्वय आणि सहकार्यासाठी संबंधित यंत्रणा नियोजित पद्धतीने कार्यरत राहतील, तसेच मराठी सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी जिथे आवश्यकता असेल तिथे ऑनलाईन सहभागी होईन, असेही सांगितले.

About Editor

Check Also

गिरीश महाजन यांची माहिती, नेपाळमधील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांसाठी केंद्र सरकारशी संपर्कात आतापर्यंत चार पर्यटकांशी संपर्क, नेपाळमध्ये गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्याच्या प्रशासनाला सूचना

नेपाळ-तिबेट परिसरातील भूकंप, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तेथे गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *