Tag Archives: msrtc

सदावर्ते म्हणाले, आमची लढाई विना दारू-मटण आणि पैशाची पण… एसटी बँकेच्या निवडणूकीत सदावर्तेंचे पॅनल उभारणार

एसटी विलनीकरणाच्या मागणीवरून अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात रणशिंग फुकले. मात्र पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना १८ दिवसांचा पोलिस तुरूंगवास आणि गुन्हे महाराष्ट्र दौऱा केल्यानंतर जामिनावर बाहेर असलेल्या सदावर्ते यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना आव्हान देत एसटी महामंडळ कर्मचारी बँकेच्या निवडणूकीत आपले पॅनल उभारणार असल्याची …

Read More »

सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी जामीन मिळण्याची शक्यता

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवास्थानावर केलेल्या आंदोलन प्रकरणी अटक करण्यात आलेले, अॅड गुणरत्न सदावर्ते यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सदावर्ते यांची आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. …

Read More »

अनिल परब म्हणाले की, “त्या” हल्लेखोर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई एसटी महामंडळाच्या बैठकीनंतर परब यांची माहिती

संप काळात ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात येणार आहे. मात्र जे कर्मचारी शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात सहभागी झाले होते, त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली. एसटीच्या कायद्यामध्ये एखादा कर्मचारी गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असेल …

Read More »

गोपीचंद पडळकर म्हणाले, तेव्हा जे ठरलं होतं त्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यानंतर पडळकरांची प्रतिक्रिया

एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्याच्या प्रश्नावरून सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, तेव्हा दे ठरलं होतं त्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही असे सांगत तो आमचा निर्णय योग्य होता असेही मत व्यक्त केले. मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचारी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या …

Read More »

घरावरील हल्ल्यानंतर शरद पवार म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण… टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही

एसटी कर्मचाऱ्यांचे एकही अधिवेशन मी चुकविले नाही. जेव्हा जेव्हा त्यांचा प्रश्न समोर आला त्यासाठी पुढाकार घेतला. काही कर्मचाऱ्यांनी चुकीचे पाऊल उचलले. तरीही आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याची स्पष्टोक्ती शरद पवार यांनी देत पण त्यांच्या चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर …

Read More »

शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांचा हल्लाबोल, चपला आणि दगडफेक सुप्रिया सुळे यांनी चर्चेची तयारी पण आंदोलक शांत न झाल्याने चर्चा झालीच नाही

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाने अंतिम निकाल दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर वलिजयोत्सव साजरा केला. पण आज अचानक दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिव्हर ओक निवासस्थानावर हल्लाबोल करत पवारांच्या घरावर दगडफेक आणि चपलाफेक केली. कर्मचाऱ्यांनी अशा पध्दतीने अचानक झालेल्या हल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणारः न्यायालयाच्या आदेशानुसार मुदतीत कारवाई नाही २२ एप्रिल पर्यंत हजर न झाल्यास कारवाई करणार

२८ ऑक्टोंबरपासून सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अखेर आपला निकाल दिला. या निकालानुसार २२ एप्रिल पर्यंत कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणताही कारवाई करण्यात येणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. न्यायालयाच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये …

Read More »

परिवहन मंत्री परब यांची घोषणा, एसटी महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरु ११ हजार कर्मचारी कंत्राटीवर घेणार

राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी देण्यात आलेली मुदत आज संपत आल्याच्या पार्श्नभूमीवर जे कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत अशा कर्मचाऱ्यांवर उद्यापासून बडतर्फी, सेवा समाप्ती आणि निलंबनाच्या कारवाईला धडक सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. आज संध्याकाळ किंवा …

Read More »

राजकीय अभिनिवेश बाजूला सारून एसटी संपावर तोडगा काढा आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे सरकारकडे मागणी

राज्यात गेल्या १५२ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर महाविकास आघाडी सरकारने पक्षीय राजकारण व राजकीय अभिनिवेश बाजूला सारून, तातडीने सन्मानजनक तोडगा काढावा आणि ग्रामीण भागाच्या जीवन वाहिनीला पुन्हा गती द्यावी अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. २९ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यात विविध भागात सुरू …

Read More »

अजित पवार आणि अनिल परब यांनी दिली एसटी कर्मचा-यांना आता शेवटची संधी ३१ मार्चपर्यंत कामावर येण्याची शेवटची संधी अन्यथा कठोर कारवाईचा इशारा

अधिवेशनाच्या कार्यकाळात भाजपाच्या आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आज विधानसभेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने निवेदन करत एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि परत कामावर हजर व्हावे असे आवाहन करत ३१ मार्च पर्यत कामावर हजर होणाऱ्यांना सेवेत सामावून घेणार असल्याचा अंतिम अल्टीमेटम दिला. तर विधानभवानतील विधिमंडळ …

Read More »