मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह एमएमआर भागातील महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असताना रेल्वेकडून मात्र आता वेळकाढूपणा केला जात आहे. राज्य सरकार, महापालिका व रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय आधीच झाला होता, असे असताना स्वतःच्या अधिकारात निर्णय घेता येत असतानाही जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. १७ तारखेपासून …
Read More »नरेंद्र मोदींचे असत्य कथन उठले देशाच्या मुळावर शेतकरी आत्महत्या लपवण्याची दिक्षा मोदींकडूनच इतर राज्यात !-सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी महत्वाच्या विषयांवरील आकडेवारी लपवून सरकारचे अपयश झाकण्याचे मोदी सरकारचे लोण शेतकरी आत्महत्या लपवण्यापर्यंत पोहचले आहे. काही राज्य सरकार शेतकरी आत्महत्यांची माहिती देत नसल्याने त्याचा अहवाल देण्यास एनसीआरबीने असमर्थता दर्शवल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून शेतकरी आत्महत्या …
Read More »आता देवेंद्र फडणवीस यांची गोयल यांना विनंती म्हणाले कांदा निर्यातीवरील बंदी हटवा
मुंबई : प्रतिनिधी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेत्यांनी केंद्राच्या या निर्णयावर टीका करत या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याची भीती व्यक्त करत चुकीचा निर्णय असल्याची टीका केली. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र …
Read More »सरकार म्हणते ८ लाख तर रेल्वे म्हणते १५ लाख कामगारांना घरी सोडले स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्याच्या आकडेवारीवरून गोंधळ
मुंबई : प्रतिनिधी राज्यात विशेषत: मुंबई महानगरातील स्थलांतरीत कामगारांना बिहार, उत्तर प्रदेशमधील स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी पोहोचविण्यावरून रेल्वे गाड्या उपलब्ध असणे-नसण्यावरून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकाबाजूला या कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमापर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वेबरोबरच एसटीने ७ ते ८ लाख जणांना पोहोचविल्याचे राज्य …
Read More »खुशखबर : लघु उद्योगांसाठी आर्थिक पॅकेज : विदेशी गुंतवणूकदारांबरोबर बोलणी सुरु राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वच औद्योगिक आणि वित्तीय कारभार ठप्प झाला आहे. त्यामुळे त्याच चालना देण्यासाठी राज्यातील लघु उद्योगांना सावरण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासंबधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गौडा, पीयुष गोयल यांच्याशी दैनंदिन चर्चा सुरू असल्याची माहिती राज्याचे उद्योग …
Read More »श्रमिक ट्रेन्सबरोबर आता प्रवासी रेल्वेही सुरु होणार : परंतु निवडक ठिकाणीच रेल्वे मंत्रालयाकडून पत्रक जाहीर
नवी दिल्ली- मुंबई: विशेष प्रतिनिधी विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक नागरिक आपल्या मूळ ठिकाणाहून इतरत्र अडकल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी विशेषत: स्थलांतरीत कामगारांसाठी श्रमिक कामगारांसाठी श्रमिक ट्रेन्स सुरु केल्या. आता त्या पाठोपाठ विशेष प्रवासी वाहतूकीच्या गाड्याही १२ मे पासून सुरु कऱण्याचा …
Read More »मजूरांच्या प्रश्नी रेल्वेमंत्री गोयल आणि मुख्यमंत्री ठाकरेंचे पवारांना आश्वासन शरद पवारांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना दूरध्वनी
मुंबई: प्रतिनिधी मजुरांच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी मजूरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रवासाची सोय करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मजूरांच्या प्रवासासाठी एसटी बसेसची सोय करणार असल्याचे सांगितल्याने मजूरांना दिलासा मिळणार …
Read More »मोदी – फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करत डंका पिटतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी देशात मोदी आणि राज्यात फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करत विकासकामांचा डंका पिटत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. निवडणुका जवळ आल्यावर केंद्र व राज्य सरकार मोठमोठया जाहिराती आणि विकासकामांची उद्घाटने करत विकास आम्हीच करत आहे असे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री पियुष …
Read More »मध्य रेल्वेने ३.३७ कोटी खर्च तर केले पण अहवाल महत्वाचा एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षेवरील खर्चावरील अहवालाची प्रतिक्षा
मुंबईः प्रतिनिधी मध्य रेल्वे प्रतिवर्षी पावसाळयापूर्वी आणि नंतर एफओबी आणि आरओबीचे सुरक्षा ऑडिट करत असून यावर्षीही आयआयटी मुंबईकडून करण्यात आलेल्या ऑडिटनंतर सुरक्षा अहवालाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. मध्य रेल्वे प्रशासनाने एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षा ऑडिटवर रुपये ३.३७ कोटी खर्च केले. आरटीआय कार्यकर्ते …
Read More »भाजपच्या गोयल यांच्या युनायटेड फॉस्फरसच्या उपाध्यक्षा व्हीजेटीआयच्या अध्यक्ष काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गौप्यस्फोट
मुंबईः प्रतिनिधी युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनवण्याचा काळा धंदा काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणली. त्यानंतर भाजपच्या पियुष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल यांच्या या कंपनीच्या उपाध्यक्षा सँड्रा आर. श्रॉफ यांची व्हीजेटीआयच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली. विशेष म्हणजे ही नियुक्ती भाजपचे सरकार आल्यानंतर …
Read More »
Marathi e-Batmya