आता देवेंद्र फडणवीस यांची गोयल यांना विनंती म्हणाले कांदा निर्यातीवरील बंदी हटवा

मुंबई : प्रतिनिधी

कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेत्यांनी केंद्राच्या या निर्णयावर टीका करत या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याची भीती व्यक्त करत चुकीचा निर्णय असल्याची टीका केली. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय व्यापार मंत्री पीयुष गोयल यांना पत्र लिहीत कांदा निर्यातीवरील बंदी मागे घ्यावी अशी मागणी केली.

यासंदर्भात त्यांनी पियुष गोयल यांच्याशी संवादही साधला होता. त्यावेळी कांदा निर्यातीमुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा चांगला भाव मिळतो. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात महाराष्ट्राच्या कांद्याला चांगला भाव मिळतो. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार असल्याने हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली.

 

About Editor

Check Also

नाना पटोले यांची टीका, भाजपा मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला, ज्ञानेश कुमारांना विचारलेल्या प्रश्नांना भाजपचे मंत्री उत्तर का देतात भाजपा व ज्ञानेशकुमारांची अभद्र युती लोकशाही व संविधान संपवणारी, मोदींच्या इशाऱ्यावर ज्ञानेशकुमारांचे काम

निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी तो भाजपाच्या दावणीला बांधला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *