Tag Archives: sanjay raut

संजय राऊतांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसादः पण हक्कभंग प्रस्तावावर अध्यक्षांची स्पष्टोक्ती दोन दिवसात तपासणी करून हक्कभंगाबाबत निर्णय घेऊ

संजय राऊतांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यासह शिंदे गटावर निशाणा साधताना राज्यात विधिमंडळ नाही, तर ४० जणांचे चोरमंडळ, अशी टीका केली होती. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले असून या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. तसेच …

Read More »

सोमय्यांसह शिंदे गटावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, चोरांना क्लिनचीट…सध्या ४० जणांच चोरमंडळ त्यासाठीच शिवगर्जना यात्रा सुरु केलीय

शिवसेनेतील फुटीच्या आणि राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुनावणी सुरु आहे. त्यातच राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. त्यातच ठाकरे गटाकडून सुरु करण्यात आलेल्या शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने खासदार संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शिंदे-भाजपा सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून किरीट सोमय्यांसारख्या २८ चोरांना …

Read More »

धंगेकरांच्या आरोपावर संजय राऊत म्हणाले, भाजपाच्या काळात पोलिसांच्या व्हॅनमधून पैशांची… रविंद्र धंगेकर यांच्या आरोपावर विश्वास ठेवावा लागले

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीने राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे. आचारसंहित लागल्यानंतर प्रचार थांबला, मात्र आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपा पोलिसांना बरोबर घेऊन पैसे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. ते शनिवारी …

Read More »

संजय राऊत यांचा आरोप, खा श्रीकांत शिंदेंनी कुख्यात गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी उपमुख्यमंत्री फडणवीस, अमित शाह यांना पत्र लिहून दिली माहिती

खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी आज केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असल्याची माहिती राऊत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. याबाबत बोलताना …

Read More »

फडणवीसांची टीका, संजय राऊत हे निर्बुध्द… तर उद्धव ठाकरेंकडे ठराविक शब्दांची ‘डिक्शनरी’ एमपीएससीसंदर्भात राज्य सरकारचा सातत्याने पाठपुरावा

उद्धव ठाकरे यांच्याकडे ठरविक शब्दांची ‘डिक्शनरी’ (शब्दकोष) आहे. त्यातीलच शब्द ते फिरवून-फिरवून वापरत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पुणे येथे आगमन झाले असता ते माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी काल माध्यमांमध्ये दिलेल्या विधानांसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता फडणवीस बोलत …

Read More »

संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, शिवसेना नाव आणि धनुष्यबाणासाठी २००० कोटींचा सौदा जे लोक न्याय विकत घेतात त्यांच्याबद्दल काय बोलणार

शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि दुसऱ्याबाजूला केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा याप्रश्नी बंडखोर एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांनी केलेल्या दाव्यावर सुनावणी सुरु होती. मात्र शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निकाल दिला. यावरून राजकिय क्षेत्रासह सर्वसामान्य …

Read More »

मशाल चिन्हाच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाकडून नव्या चिन्ह आणि नावासाठी हालचाली संजय राऊतांनी मातोश्रीवरील भेटीनंतर दिली माहिती

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे? यावरून सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रिय निवडणूक आयोगासमोर उध्दव ठाकरे गट आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय हाती येण्यापूर्वीच केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देऊन टाकले. त्यातच समता पार्टीच्या एका …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर संजय राऊत म्हणाले, …अखेर न्यायालयाला ठरवावं लागेल ठाकरे गटाची मागणी पाच सदस्यी घटनापीठाने फेटाळली

महाराष्ट्रासह देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बनलेल्या शिंदे आणि ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर सलग तीन दिवस सुनावणी घेतली. या दरम्यान, नबाम रेबिया खटल्याचा संदर्भ देण्यात आला. तसेच पक्षांतर बंदी कायद्याच्या अनुषंगाने परिशिष्ट १० चा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला. या साऱ्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण किचकट असल्याचे स्पष्ट करत ही याचिका ७ …

Read More »

न्यायालयाने निर्णय राखून ठेवताच संजय राऊत म्हणाले, अजूनही या देशात न्याय जिवंत आमचा न्यायालयावर विश्वास

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जणांनी बंड पुकारत शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरच दावा ठोकला. याप्रश्नी ज्या नबाम रेबिया या खटल्याचा संदर्भ देण्यात येतो त्या खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या ७ सदस्यीय खंडपीठा समोर झाली होती. मात्र आता परिशिष्ठ १० मधील सुधारणेनंतर या याचिकेची सुनावणीही …

Read More »

संजय राऊत यांच्या त्या टीकेला दिपक केसरकर यांचे प्रत्युत्तर, …तुमचे बाबा आहेत टेस्ट ट्युब बेबी या टीकेला दिले खोचक प्रत्युत्तर

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या शिवसेना आणि निवडणूक चिन्ह कोणाचे यावरून उध्दव ठाकरे आणि बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या न्यायालयीन लढाईबाबत बोलताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही शिंदे गटाला मिळणार असल्याचे भाकित केले. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत शिंदे गटाला …

Read More »