Tag Archives: shivsena

अंबादास दानवे म्हणाले, एकनाथांच्या भूमीला गद्दार हा डाग लावला शिंदे-फडणवीस सरकार हे लूट करणारे सरकार

दोन तीन मंत्री हे संभाजीनगर जिल्ह्यात असून देखील अतिवृष्टीमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या यादीत मतदारसंघाचे नाव नाही हे खेदजनक असल्याचे म्हणत शिंदे फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बेरोजगारांच्या विरोधात असून लूट करणारे सरकार असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. आज पैठण येथे आयोजित मेळाव्यात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, आम्हाला गाजरं, चॉकलेट नको…मुख्यमंत्री फक्त स्वत:साठी दिल्लीत प्रकल्पाची कोणतीच माहिती मुख्यमंत्र्यांना नाही

मागील काही दिवसांपासून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यापाठोपाठ बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाईस प्रकल्प एकामागो एक महाराष्ट्रातून गेले. तसेच मुंबईतल्या वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी लागणाऱ्या अभियंत्याच्या मुलाखती महाराष्ट्राऐवजी चेन्नईत घेण्यात येत असल्यावरून युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तळेगांव …

Read More »

पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्का

पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये आणि पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच …

Read More »

न्यायालयाच्या निकालानंतर उध्दव ठाकरे म्हणाले, उत्साहात या, शिस्तीने या पण गालबोट… सर्वोच्च न्यायालयाचा निकालही लोकशाहीला दिशा देणार असेल

शिवसेनेतील बंडानंतर परंपरागत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर आणि पक्षावर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला. यापैकी शिवसेनेवरील दाव्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर याचिका प्रलंबित आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नसला तरी शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा घेण्याबाबत मुंबई महापालिकेकडून नकारघंटा कळविल्यानंतरही मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाला धक्का देत उध्दव ठाकरे …

Read More »

आदित्य ठाकरेंना भाजपाने पाच प्रश्न विचारत दिले आव्हान, आधी प्रकल्पाची जागा दाखवा

घराण्याच्या वारशातून शिवसेनेचे नेतेपदाची माळ गळ्यात पडलेले आदित्य ठाकरे यांच्या वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयीच्या आक्रोशाचे पितळ येत्या शनिवारी ते स्वतःच उघडे करणार आहेत. या प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारने अडीच वर्षात काहीही प्रयत्न केले नसल्याचा पुरावा आदित्य ठाकरे स्वतःच येत्या शनिवारी तळेगावजवळ आयोजित केलेल्या आंदोलनातून देणार असल्याने त्यांच्या आंदोलनाची महाराष्ट्र वाटच पाहात आहे, अशी …

Read More »

भाजपाचा इशारा, उद्धव ठाकरे… नाही तर आहे ते आमदारही गमवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला इशारा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतका धसका का घेतला आहे, समजत नाही. त्यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी विचार करून बोलावे नाही तर उरलेल्या आमदारांपैकी बहुतेकजण सोडून जातील आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणत केवळ चारच उरतील, अशी खोचक इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिला. छत्रपती संभाजीनगर येथे …

Read More »

दसरा मेळावा: मुंबई महापालिकेचा निर्णय तथ्यहीन, उच्च न्यायालयाची ठाकरे गटाला परवानगी उध्दव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

बंडखोरीनंतर शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटाने मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली. मात्र या दोन्ही गटापैकी एकाला जरी परवानगी दिली तर मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी देण्यास नकार दिला. त्या विरोधात उध्दव ठाकरे गट आणि …

Read More »

नारायण राणे यांना किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर, एवढी मिरची लागण्याची काय गरज? एखाद्या गुंडासारखी भाषणा केंद्रीय मंत्री बोलतायत

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी २१ सप्टेंबर रोजी गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  तसेच बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका केली. या टीकेनंतर शिंदे गट तसेच भाजपाचे नेतेही आक्रमक झाले असून त्यांनी उद्धव ठाकरेंना जशास तसे प्रत्युत्तर दिले. केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांनी आज गुरुवारी थेट पत्रकार …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या बाप चोरणारी टोळीला शिंदे गटाचे प्रत्युत्तर, मग शिवाजी महाराज… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरूष

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगांव येथील नेस्को मैदानावर झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये पक्षात फूट पाडणारे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना लक्ष्य करताना दुसऱ्याचे बाप पळविणारी टोळी सध्या सक्रिय असल्याची टीका केली. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि नाव न घेता निवडणूका लढण्याचे आव्हान उध्दव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना …

Read More »

नारायण राणे म्हणाले, उध्दव ठाकरे लबाड लांडगा… मुख्यमंत्री असल्याचा काळ हा महाराष्ट्राचा काळीमा

उद्धव ठाकरे खरं बोलत नाहीत, ते अत्यंत खोटारडे आहेत. युती असताना काल-परवापर्यंत उद्धव ठाकरे अमित शाहना फोन करत होते. मला भाजपात घेऊ नये, मंत्रिपद देऊ नये यासाठी ते शेवटपर्यंत अमित शाहांना फोन करत होते. उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहेत. ते अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले हा महाराष्ट्रासाठी काळिमा आहे. त्यांनी काहीही …

Read More »