पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्का

पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये आणि पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच यापुढे पालघर जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिवसेनेच्या विस्तारासाठी जिल्ह्यात कार्यरत राहण्याचे निर्देश दिले.

वैभव संख्ये यांनी युती सरकारला पाठींबा देणे हा पालघर जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का आहे. तर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचे हात अधिक बळकट झाले आहेत.

About Editor

Check Also

गुलाबराव पाटील यांचे आदेश, पाणीटंचाई निवारणासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करा टँकर हा अंतिम पर्याय; जलस्रोत बळकटीकरण, नाला खोलीकरण, 75 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण योजना तातडीने कार्यान्वित करा

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन, जलस्रोतांचे बळकटीकरण, नाला खोलीकरण व जलसंधारणाची कामे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *