Tag Archives: shivsena

फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, अजित पवारांना….ते विकेट गेल्याचे सांगतायत आम्ही फसवलं पण तुम्ही का फसलात ? फडणवीसांवर पलटवार

एकाबाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीकडून राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असतानाच अचानक पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला. मात्र ते सरकार औटघटकेचे ठरले. त्या मागे नेमके कोणं होतं याची उत्सुकता अद्यापही राज्यातील जनतेत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

त्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, शरद पवारांनी डबल गेम खेळला.. आधी चर्चा केली आणि नंतर भूमिका बदलली

राज्यात २०२४ च्या निवडणूकांना आता एक वर्षाचा कालावधी राहिलेला असतानाच भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या निवडणूकीत औट घटकेच्या भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारवरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. २०१९ साली विधानसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उडविली खिल्ली, दहा मुख्यमंत्री असलेली पार्टी… मुख्यमंत्री पदासाठी विठुरायाकडे जातायत..

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या प्रमुख नेत्यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचे लोण काँग्रेसमध्येही पसरले. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचेही त्यांच्या समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर लागण्यास सुरुवात झाली. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने उध्दव ठाकरे यांना पुन्हा …

Read More »

त्या जाहिरातीवरून अजित पवार यांचे खुले आव्हान, तुम्ही जर इतके लोकप्रिय आहात तर…मैदानात या

आता शिवसेना आमचीच अशाप्रकारचा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये मोदींचा आणि स्वतः चा फोटो टाकला. परंतु बाळासाहेबांचा फोटो मात्र सोयीस्कररित्या त्यांनी वगळला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. अजित पवार पुढे म्हणाले की, तुम्ही जनतेला आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनीच शिवसेना पुढे घेऊन …

Read More »

सर्वोच्च न्यायालयः …तर घडाळ्याचे काटे उलटे फिरवले असते… सध्याचे सरकार बेकायदेशीर राज्यपालांचे निर्णय बेकायदेशीर, प्रतोद नियुक्तीचा अधिकार राजकिय पक्षाचा

महाराष्ट्रातील जनतेने निवडूण दिलेले महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी राज्यपालांनी एका विशिष्ट पक्षाच्या बाजूने कल दाखवित त्या पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी एकप्रकारे मदत केली अशा कडक शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत राज्यापालांनी राज्य घटनेच्या बाहेर जाऊन वर्तन केले जे अपेक्षितच नव्हते. तसेच प्रतोद अर्थात व्हीप नियुक्तीचा अधिकार हा राजकिय पक्षाचा …

Read More »

शरद पवार यांचे पुन्हा संभ्रमातित वक्तव्य; २०२४ ला मविआ म्हणून लढण्याचा निर्णय….. राजकिय वर्तुळात तर्त-वितर्कांना उधाण

राज्यातील विरोधकांकडून एकाबाजूला भाजपाला हरविण्यासाठी विविध पातळीवर मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु असतानाच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात परस्पर विरोधी भूमिका असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अदानीप्रकरणी जेपीसी काँग्रेसची भूमिका असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …

Read More »

संजय राऊत यांचा हल्लाबोल, गुलाबो गँग….पालकमंत्री असताना ४०० कोटींचा भ्रष्टाचार काही दगड आमच्याकडे सोनं म्हणून होते पण ते दगडच निघाले

राज्यातील सत्तांतरानंतर आणि शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे पहिल्यांदाच जळगावातील पाचोऱ्यात आज येत आहेत. या निमित्ताने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात सभेपूर्वीच एकमेकांवर टीका टीपण्णीचे वाक्ययुध्द चांगलेच रंगल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. या सगळ्या वाक्ययुध्दात खासदार संजय राऊत …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, महाविकास आघाडीतच निवडणुक लढवा, अन्यथा… बाजार समिती, खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाशी युती करु नये

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्यात महाविकास आघाडी आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पक्षाचा निर्णय आहे. परंतु काही ठिकाणी शिंदे गट व भाजपाशी युती केल्याच्या तक्रारी येत आहेत, हे पक्षशिस्तीचे उल्लंघन आहे. अशी युती करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेस …

Read More »

बाबरी प्रकरणी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे म्हणाले, मी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सत्तेतील काही मंत्री काही दिवसांपूर्वी अयोध्येमध्ये जाऊन आले. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वबूमीवर भाजपा नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी भाजपा-शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात खडाजंगी सुरू झाली …

Read More »

चंद्रकांत पाटील यांनी बाबरीप्रकरणी थेट उपस्थित केला स्व. बाळासाहेबांच्या सहभागावर प्रश्न बाबरीचा ढाचा शिवसेनेने नाही तर बजरंग दलाने पाडला

संबध देशात मंडल-कमंडलु राजकारणाचा परिणाम १९९२ च्या डिसेंबर महिन्यात बाबरी मशीदच्या विध्वंसात झाली. त्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशालाच या घटनेचे परिणाम भोगावे लागले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २०१९ साली या प्रकरणी भाजपा आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांना निर्दोष सोडले. त्यानंतर बाबरीचा विध्वंसाचे श्रेयावरून त्यावेळचे भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केलेले वक्तव्य आणि तत्पूर्वी …

Read More »