मुंबई: प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची घोषणा करत १२ वीची परिक्षाही रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे अनलॉकबाबत वडेट्टीवारांना युटर्न घ्यावा लागला. परंतु त्यांनी केलेली १२ वीची परिक्षा रद्दची घोषणा अधिकृतरित्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी …
Read More »वडेट्टीवारांचे “अनलॉक” तर सीएमओचे “प्रस्ताव विचाराधीन” राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन-मुख्यमंत्री कार्यालय
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिल २०२१ रोजी पासून राज्यात निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर १ जूनपासून पॉझिटीव्हीटी दर कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यास राज्य सरकारने मान्यता देत निर्बंध कडक ठेवण्याबाबतचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले. त्याच दोनच दिवसांचा कालावधी लोटला नाही तोच आज मदत व पुर्नवसन मंत्री …
Read More »१२ वीची परिक्षा रद्द तर राज्यात पाच टप्प्यात पूर्णत: अनलॉक निर्बंध मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी १० वी पाठोपाठ १२ वीची परिक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध पाच टप्प्यात उठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली …
Read More »काँग्रेस नेते-मंत्री करणार मोदी सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने: नाना पटोले
मुंबई: प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सात वर्षातील कारभाराने देश २५ वर्षे अधोगतीकडे गेला असून त्याचे गंभीर परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत. मागील सात वर्षांत मोदींनी विकासाच्या नावाखाली देश भकास करुन टाकला आहे. काँग्रेसच्या सरकारने ७० वर्षात देशाला समृद्ध, स्वाभिमानी राष्ट्र म्हणून जगात ताठमानेने उभे केले त्याची …
Read More »तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मिळणार वाढीव दराने आर्थिक मदत राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मदतीचे पॅकेज जाहिर
मुंबई: प्रतिनिधी राज्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. केंद्रशासनाने विहित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने मदत देण्यात येणार असल्यामुळे वाढीव दरामुळे पडणारा आर्थिक भार राज्य शासनाच्या निधीमधून करण्यास मान्यता देण्यात आली. ही मदत खालील …
Read More »#BreakTheChain अंतर्गत आता ही दुकानेही उघडी राहणार अत्यावश्यक प्रवर्गात समावेशाचे राज्य सरकारकडून आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी १५ मे ते २० मे च्या दरम्यान झालेल्या वादळामुळे प्रभावित झालेल्या किंवा तोंडावर आलेल्या पावसाळ्यात प्रभावित होण्याची शक्यता असणाऱ्या बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची दुरुस्ती / मजबुतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याशी संबंधित दुकाने / व्यवसाय यांचा समावेश अत्यावश्यक प्रवर्गात करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या प्रसाराची शृंखला तोडण्यासाठी राज्य शासनाने १३ एप्रिल …
Read More »मराठा आरक्षणः मराठा उमेदवारांसाठी सर्व जिल्ह्यांत ‘विशेष कार्य अधिकारी’ सोमवारपासून मुख्य सचिव घेणार नोकरभरती प्रक्रियेचा आढावा
मुंबई : प्रतिनिधी सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गाच्या प्रलंबित नोकर भरती प्रक्रियेचा मुख्य सचिव येत्या सोमवारपासून संबंधित विभागाच्या सचिवांकडून आढावा घेणार असून, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची समीक्षा करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मराठा आरक्षण विषयक …
Read More »अजित पवारांचे आदेश, आर्थिक पॅकेजमधील लाभार्थ्यांना मदत निधी वाटप करा निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही
मुंबई: प्रतिनिधी ‘कोरोना’संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ५ हजार ४७६ कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहोचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिले. सात कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, सामाजिक न्याय विभागाच्या ३५ लाख, आदिवासी विभागाच्या १२ …
Read More »… पंतप्रधान आता शेतक-यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पाहतायत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा आरोप
नागपूर: प्रतिनिधी केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून आणलेले कृषी कायदे शेतक-यांना उद्धवस्त करणार आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतक-यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पहात आहेत. पण काँग्रेस पक्ष त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »शासकीय भरतीसाठी आदिवासीबहुल ८ जिल्ह्यांतील OBC लोकसंख्या अभ्यासाचा अहवाल लवकरच मंत्रिमंडळासमोर उपसमितीचे प्रमुख छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांतील इतर मागासवर्ग तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीच्या प्रवर्गाची प्रचलित शासकीय पदभरतीमधील आरक्षणाची टक्केवारी आणि प्रवर्गाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन या संदर्भात राज्य सरकारला उपाययोजना सुचविण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात …
Read More »
Marathi e-Batmya