अखेर नाराज खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा राष्ट्रवादीकडून २३ तारखेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची प्रदेशाध्यक्ष पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या चार वर्षापासून माझ्यावर अन्याय होत असल्याची भावना वेळोवेळी जाहीरपणे बोलून दाखविणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर आज सका‌ळी भाजपाला सोडचिठ्ठी देत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दुपारी दिली.

एकनाथ खडसे यांच्यावर भाजपामध्ये अन्याय झाला आहे. ते काही एका मतदारसंघ किंवा विभागापूरते मर्यादीत नाहीत. त्यांचा राज्यातील अनेक भागात संपर्क आहे. यासंदर्भात सकाळी त्यांच्याशी बोलणे झाले, त्यावेळी त्यांनी आपण भाजपा सोडल्याचे सांगत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे खडसे यांनी सांगितल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाचा रितसर कार्यक्रम शुक्रवारी दुपारी २ वाजता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील भाजपामधील अनेक आमदार, नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक आहेत. मात्र सध्या कोरोनाचा काळ असल्याने आम्ही आताच किंवा खडसेंसोबत इतरांना प्रवेश देणार नाही. कारण आम्हाला लगेच विधानसभेच्या निवडणूका घडवून आणायच्या नसल्याचे स्पष्ट करत बाकिच्यांना टप्प्याटप्प्याने प्रवेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे यांच्या भाजपा सोडचिठ्ठीची घोषणा केल्यानंतरही भाजपाकडून अधिकृत घोषणा किंवा त्याविषयीचे वक्तव्य जाहीर केले नव्हते. अखेर त्यानंतर तब्बल तासभरानंतर भाजपाने खडसेंच्या राजीनाम्याचे पत्र मिळाल्याचे माहिती प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.

About Editor

Check Also

हसन मुश्रीफ यांचे आवाहन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्या अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा, सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामांचा आढावा

महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील शासकीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *