मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदी अशोक भाई जगताप यांची निवड काँग्रेस कमिटीकडून मुंबई पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी

मागील दोन वर्षापासून रिक्त असलेल्या मुंबई काँग्रेसला अध्यक्ष मिळाला असून मुंबई अध्यक्षपदी अशोक भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारी अध्यक्ष पदी चरणजीत सप्रा यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रचार समितीच्या प्रमुख पदी मो.आरीफ नसीम खान यांची निवड करण्यात आल्याचे एका प्रसिध्दी पत्रकान्वये जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या सुरेश शेट्टी यांच्याकडे जाहिरनामा आणि प्रकाशन समितीचे प्रमुख पद सोपविण्यात आली नाही. मात्र डॉ.अमरजितसिंह मनहास यांच्याकडे समन्वय समितीचे प्रमुख पद सोपविण्यात आले आहे. तर चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससाठी मुंबई प्रदेश काँग्रेसच्या इन्चार्ज पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य पदी माजी खासदार प्रिया दत्त, आमदार अमिन पटेल, जेनेट डिसूझा, उपेंद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवाना भेट

युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *