मी गुन्हेगार आहे का? पाळत ठेवायला विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई : प्रतिनिधी

माझ्या घरात साध्या वेशातील पोलिस येवून बसतात. मी काय करतो याची माहिती घेतात. मी काय गुन्हेगार आहे का? पाळत ठेवायला असा सवाल राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत यासंदर्भात राज्यपालांना भेटून तक्रार करणार असून पोलिसातही तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नरिमन पाँईट येथील शासकिय निवासस्थानी विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. पत्रकार परिषदेनंतरही काही पत्रकारांशी ते गप्पा मारत बसले होते. त्यावेळी एक साध्या वेषातील व्यक्ती त्या पत्रकारांसमवेत बसलेला आढळून आला. त्यावेळी त्यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांने पोलिस असल्याचे सांगितले. तेव्हा ही बाब त्यांनी तात्काळ पत्रकारांच्या निदर्शनास आणून देत राज्य सरकारकडून माझ्यावर अशा पध्दतीची पाळत ठेवण्यात येत असून अशा घटना वारंवार घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

एखाद्या गुन्हेगाराची माहिती जशी गुप्तपणे माहीती घेतली जाते. त्या पध्दतीने पोलिसांकडून माझ्याज घरातून माहिती घेतली जाते. त्यामुळे मी गुन्हेगार आहे का? असा संतप्त सवाल करत सरकारला विरोधकांच्या भयाने ग्रासले असल्यानेच अशा पध्दतीचे कृत्य करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांच्या घरात पोलीस विभागाचे दोन कर्मचारी( स्पेशल ब्रँच ) हजर असल्याची बाब निदर्शनास येणे ही बाब अत्यंत गंभीर असून काँग्रेस पक्ष याचा निषेध करत आहे. त्याचबरोबर सरकार विरोधी पक्षावर गुप्त पद्धतीने पाळत ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

About Editor

Check Also

साताऱ्यात मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यांना भगदाड, मतदारांचा घराणेशाहीला स्पष्ट नकार मंत्री मकरंद पाटील, जयकुमार गोरे यांच्या गडाला धक्का

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *