फैजान मिर्जा यांचे नितेश राणेंना सवाल, पंतप्रधानांवर टीका केली म्हणून देशद्रोह कसा? आधी संविधान वाचा, मग देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटा

अटल बिहारी वाजपेयीजी म्हणायचे की मजबूत लोकशाहीसाठी टीका आणि टिप्पणी होणं गरजेचं आहे; त्यातूनच लोकशाही मजबूत होते. मग माझा नितेश राणेंना सरळ प्रश्न आहे — पंतप्रधानांवर टीका केली म्हणून एखादा माणूस देशद्रोही कसा होतो? कायद्यात अशी कोणती परिभाषा लिहिलेली आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या प्रवक्ते फैजान मिर्जा यांनी केला.

पुढे बोलताना फैजान मिर्जा म्हणाले की, संविधानाच्या Article 19(1)(a) मध्ये नागरिकांना Freedom of Speech and Expression चा मूलभूत अधिकार दिलेला आहे. तुम्ही स्वतः मंत्री आहात; मग संविधानात काय लिहिलं आहे, याचं किमान ज्ञान तरी असायला हवं असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

फैजान मिर्झा पुढे बोलताना म्हणाले की, आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि अनिल देशमुख गृहमंत्री असताना तुम्ही त्यांच्यावर अतिशय तीव्र भाषेत टीका करत होतात. तेव्हा तुम्ही महाराष्ट्रद्रोही होता का? पाकिस्तानच्या स्क्रिप्टवर बोलत होता का? याचं उत्तरही तुम्ही जनतेला द्यावं अशी मागणी केली.

शेवटी बोलताना फैजान मिर्जा म्हणाले की, सत्ता बदलली म्हणून संविधान बदलत नाही. टीका म्हणजे देशद्रोह नाही; टीकेला उत्तर देणं हीच लोकशाही असल्याची आठवणही यावेळी नितेश राणे यांना करून दिली.

About Editor

Check Also

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ ऑनलाईन पास काढता येणार त्यामुळे प्रवाशांना आगारात जाण्याची आवश्यकता नाही

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *