दत्तांच्या ‘पलटन’मध्ये मोनिकाची एंट्री हर्षवर्धन राणे सोबत जमणार जोडी

मुंबई : प्रतिनिधी

देशभक्ती चित्रपटासाठी प्रसिध्द असलेल्या निर्माता दिग्दर्शक जे.पी.दत्ता यांच्या आगामी पलटन चित्रपटात मोनिका गिल या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही तीच मोनिका गिल आहे जी मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘फिरंगी’ चित्रपटामध्ये कपिल शर्मासोबत चमकली होती. दुसऱ्याच चित्रपटात मोनिकाला जे. पी. दत्तांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी लाभली असून दत्तांनी मोनिकाला ‘पलटन’मध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यासाठी साईन केल्याचं समजतं.

या चित्रपटात लेफ्टनेंट कर्नलची भूमिका साकारणाऱ्या हर्षवर्धन राणेसोबत मोनिकाची जोडी जमली आहे. या भूमिकेसाठी उत्साहाने काम करू शकणाऱ्या काहीशा नवख्या चेहऱ्याची गरज होती असं सूत्रांच्या माहितीवरून समजतं. जेपी फिल्मची निर्मिती आणि झी स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या ‘पलटन’मध्ये सोनू सूद, अर्जुन रामपाल, लव सिन्हा, सिध्दांत कपूर, गुरुमीत चौधरी आणि जॅकी श्रॉफ​ यांच्याही भूमिका आहेत.

‘पलटन’च्या निमित्ताने कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच जेपींसारखा दिग्दर्शक आणि बॅालिवुडमधील सध्याच्या आघाडीच्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मोनिका खूप खुश असल्याचं सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजतं.

About Editor

Check Also

रणवीर सिंगच्या विरोधात बॅनचे अस्त्र, डॉन ३ मधून अचानक बाहेर पडला फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने घातली बंदी

फरहान अख्तरच्या ‘डॉन ३’ मधून अचानक बाहेर पडल्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, फेडरेशन ऑफ वेस्टर्न …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *