ऑनस्क्रीन व्हॅलेंटाइन कपल पण प्रेक्षकांना भेटणार १६ मार्चला

मुंबई : प्रतिनिधी

‘कॅाफी आणि बरंच काही’ आणि ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी रसिकांची फेव्हरेट आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावल्याने ही जोडी पुन्हा कधी एकत्र येते याची जणू उत्सुकताच प्रेक्षकांना लागलेली असते. व्हॅलेंटाइन डे जवळ आला असून सध्या सगळीकडे याच जोडीची चर्चा सुरू आहे. ‘What’s up लग्न’ या आगामी चित्रपटात प्रार्थना-वैभव पुन्हा एकत्र दिसणार असल्याने ही जोडीच यंदाचं व्हॅलेंटाइन कपल आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

‘व्हॅलेंटाइन डे’ म्हटला की दिवसभर आपल्या प्रिय व्यक्तीसोबत धम्माल करायची. सकाळी उठल्यापासूनचा प्रत्येक क्षण तिच्यासोबत घालवायचा. यात भेटवस्तू देणं, कॅाफी शॅापमध्ये जाऊन गप्पा मारणं, निसर्गरम्य स्थळी जाऊन आपल्या जीवनातील रोमँटिक क्षण कैद करण्यासोबतच आपल्या प्रिय व्यक्तीला जे आवडतं ते करण्यातच स्वत:चा आनंद मानणं हे सुद्धा आलंच. वैभव-प्रार्थना हे यंदाचं व्हॅलेंटाइन कपल ‘What’s up लग्न’  या चित्रपटात अशाच प्रकारचे रोमँटिक क्षण साजरे करताना दिसणार आहे. फिनक्राफ्ट मीडिया’ अँड ‘एन्टरटेन्मेंट प्रा. लि’. या बॅनरखाली तयार झालेल्या ‘What’s up लग्न’  या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे. जाई जोशी व व्हिडीओ पॅलेस हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. हा चित्रपट १६ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

About Editor

Check Also

One-battle-after-another-Movie

Oscar 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अदर’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकला, फक्त सहा पुरस्कार जिंकले

Oscar 2026: ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत पॉल थॉमस अँडरसनचा “वन बॅटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *